• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मिलिंद सोमणचा अनोखा विक्रम; मुंबई ते गुजरात करतोय पायी प्रवास

मिलिंद सोमणचा अनोखा विक्रम; मुंबई ते गुजरात करतोय पायी प्रवास

तो मुंबई ते गुजरात (travel Mumbai to Gujarat) अनवाणी प्रवास करत आहे.

 • Share this:
  मुंबई 21 ऑगस्ट: अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) हा वयाच्या 55 व्या वर्षी देखील फिट अँड फाईन आहे. एकाद्या 25 वर्षांच्या तरुणाला त्याच्याकडे पाहून लाज वाटेल असं दमदार शरीरयष्टी त्याच्याकडे आहे. अन् त्याच्या या सुदृढ शरीराचं संपूर्ण श्रेय जातं त्याच्या नियमित व्यायामाला. (Milind Soman fitness) दररोज व्यायाम करण्यासाठी तरुणांना प्रेरित करणारा मिलिंद आता एक नवा विक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. तो मुंबई ते गुजरात (travel Mumbai to Gujarat) अनवाणी प्रवास करत आहे. 15 ऑगस्ट रोजी मुंबईहून निघून 22 ऑगस्ट रोजी सरदार सरोवर डॅम, केवाडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचण्याचे त्याने ठरविलं आहे. हे 420 किलोमीटरचे अंतर पार करत असताना त्या 8 दिवसात वाटेत लागणाऱ्या शाळा, रुग्णालये, गावं यांना भेट देत एकता, शांतता आणि आरोग्य यांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. मिलिंदनं काही दिवसांपूर्वी उत्तरेकडील काही राज्यांचा दौरा केला होता. त्यात त्यानं अनेक गावांना भेटी दिल्या. तेथील परिस्थिती जाणून घेतली. चाहत्यांशी संवाद साधला होता.रा केला होता. त्यात त्यानं अनेक गावांना भेटी दिल्या. तेथील परिस्थिती जाणून घेतली. चाहत्यांशी संवाद साधला होता. OTT वर इतक्या कोटींना विकला गेला 'झुंड'; थिएटरमध्ये पाहायला मिळणार की नाही?
  यापूर्वी मिलिंद पुशअप्स चॅलेंजमुळे चर्चेत होता. मिलिंदची ही फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो पुशअप्स कसे मारायचे? आणि कसे मारायचे नाहीत? याबद्दल मार्गदर्शन केलं होतं. शिवाय व्हिडीओच्या शेवटी त्यानं एक मिनिटांत 40 पुशअप्स मारुन दाखवले. खरं तर पुशअप्स हा अत्यंत कठीण प्रकार आहे. यामध्ये केवळ हाताच्या आधारावर संपूर्ण शरीराचं वजन उचलावं लागतं. हा व्यायाम करताना शरीराचं संतुलन असणं गरजेचं आहे. अन्यथा हात किंवा पाठ लचकू शकते. परंतु मिलिंद दररोज न चूकता हा व्यायाम करतो त्यामुळं आता तो अगदी पटाईत झाला आहे. अन् तुम्हाला देखील अशी फिटनेस हवी असेल तर दररोज व्यायाम करा असा सल्ला त्यानं या व्हिडीओद्वारे चाहत्यांना दिला.
  Published by:Mandar Gurav
  First published: