'कांटा लगा गर्ल' नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आणि डान्सर शेफाली जरीवाला रिऍलिटी शो बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून गेल्यापासून सतत चर्चेत होती. आता पुन्हा एकदा शेफाली तिच्या काही फोटोजमुळे चर्चेत आली आहे.(Photo Credit- @mikasingh/Instagram)
गेल्या काही दिवसांपूर्वी शेफाली जरीवालाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले होते. या फोटोमध्ये ती कधी चाकू, तर कधी बेसबॉल बॅट असे प्रॉप्स घेऊन मिका सिंहसोबत दिसतेय. मिकासोबतच्या या फोटोवर शेफालीने प्रतिक्रिया दिली आहे. (Photo Credit- @mikasingh/Instagram)
याबाबत स्पॉटबॉयशी बोलताना शेफालीने सांगितलं की, 'मिका आणि मी गेल्या 15 वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही दोघांनी आमच्या शोसाठी जगभरात अनेक ठिकाणी एकत्र ट्रॅव्हल केलं आहे. आम्हाला नेहमीच एकत्र काहीतरी इन्ट्रेस्टिंग करण्याची इच्छा होती. भेटल्यावर आम्ही याबद्दल नेहमीच चर्चा करत होतो' (Photo Credit- @mikasingh/Instagram)
'मी बिग बॉसमधून बाहेर आली आणि लॉकडाऊन घोषित झालं. या लॉकडाऊन दरम्यान, आमच्यात आगामी प्रोजेक्टविषयी अधिक चर्चा झाल्याचं', शेफालीने सांगितलं.
हे फोटो मिका सिंह आणि शेफालीच्या आगामी म्युझिक व्हिडिओचा भाग आहेत. हे दोघे लवकरच एका म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोशल मीडियावर दोघांनीही फोटो शेअर करत याचीच एक हिंट दिली आहे. (Photo Credit- @mikasingh/Instagram)