मुंबई, 02 मे : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री मेघा घाडगे यांनी आज न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हमधून आज त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या चाहत्यांशी मनमुराद गप्पा मारल्या. चाहत्यांच्या आग्रहाखातर लावण्या सुद्धा म्हटल्या. पण या लाइव्हमध्ये त्यांनी लॉकडाऊनवर एक खास लावणी गायली आहे. मेघा घाटगे सध्या त्यांच्या घरी असून त्या लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत आहेत. आज त्यांनी त्यांच्या चाहत्यांशी न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाइव्हमधून संवाद साधला. यावेळी त्यांनी या रावजी… या लावणीचं लॉकडाऊन व्हर्जन सादर केलं. या रावजी… लाइव्ह भावजी… अशी ही लावणी त्यांनी या लाइव्हच्या सुरुवातीला सादर केली. स्वप्नील जोशीची रामानंद सागर यांच्याशी अशी झाली होती पहिली भेट!
मेघा घाटगे यांनी यावेळी त्यांच्या चाहत्यांशी धम्माल गप्पा मारल्या. कारभारी दमानं…, नाद खुळा…, या रावजी…, सरला घडीचा डाव… अशा अनेक लावण्या सुद्धा त्यांनी गायल्या. यावेळी त्यांनी त्यांचा पहिला सिनेमा ‘पछाडलेला’ या सिनेमाच्या शूटिंगवेळच्या काही आठवणी चाहत्यांशी शेअर केल्या. या सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मेघा यांची तब्येत बिघडलेली असताना त्यांनी या सिनेमाचं शूटिंग कसं पूर्ण केलं याचा अनुभव त्यांनी यावेळी शेअर केला. ‘त्यानं मला आयुष्यभरासाठी बिघडवलं…’ इरफानची पत्नी सुतापा अखेर अशी झाली व्यक्त
सध्या तामाशा कलावंतांकडे अनेक लोक वेगळ्या नजरेनं बघतात. मात्र ही एक लोककला आहे आणि आम्ही ती जपत आहोत. यात वाईट असं काही नाही. काही विकृत लोका तामाशा कलावंताकडे वाईट नजरेनं पाहतात आणि कमेंट करत असतात. पण असं खरं तर व्हायला नको पण अशा लोकांकडे लक्ष दिला तर आपण प्रगती करु शकत नाही असं मेघा घाटगे यावेळी म्हणाल्या. तसेच त्यांनी कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आहे आणि याचं काटेकोर पालन करा आणि घरीच राहा असं आवाहन केलं. ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकला नाही मुलगा रणबीर