मुंबई, 9 मार्च, 'गॅरी', 'शनाया'... म्हणजेच 'शन्या', 'राधिका' अशी ही पात्र काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. निमित्त होतं ते म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचं. जवळपास चार वर्षांहून अधिक काळापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली आहे. टीआरपीच्या शर्यतीतही बाजी मारणाऱ्या या मालिकेला आणि मालिकेतील कलाकाराला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मालिकेनं निरोप घेतला आहे. असं जरी असलं तरी प्रेक्षक आजही या मालिकेला मिस करताना दिसतात. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. हो ही मालिका आता पुन्हा सुरू होणार आहे. याबद्दल नुकतीच एक माहिती समोर आली आहे.
एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका 27 मार्च पासुन zee चित्र मंदिर वरती पुन्हा सुरू होणार आहे. चाहते देखील मालिका पाहण्यासाठी उत्साही आहेत. अशा अनेक मालिका आहेत जे प्रेक्षकांच्या आग्रहखातर पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
वाचा-'' ..म्हणून आई बडवायची'', हेमांगीनं सतीश कौशिक यांना सांगितला होता 'तो' किस्सा
गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेनं रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य केलं. आजवरचे टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले होते. आता ही मालिका पुन्हा भेटीला येणार आहेत.
View this post on Instagram
झी मराठीवरील अनेक मालिका आहेत ज्या प्रेक्षकांच्या मनात आजही स्थान निर्माण करून आहेत. आभाळमाया, वादळवाट तसेत नुकतीच निरोप घेतलेली मालिका माझी तुझी रेशीमगाठ या मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. या मालिकेतील कलाकारांचा मोठा चाहता वर्ग आहे.
मागच्या काही दिवसात झी मराठीपेक्षा स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पुढे आहेत. झी मराठी देखील सातत्याने नवीन प्रयोग करताना दिसते. सध्या टीआरपीच्या रेसमध्ये आई कुठे काय करते या मालिकेनं बाजी मारली आहे. स्टार प्रवाह वहिनीवरील ही मालिका सततच्या ट्वीस्ट आणि टर्नमुळं चर्चेत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial