मुंबई, 19 जानेवारी- झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका बनली आहे. मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री तसेच छोट्या परीचा गोड अभिनय प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला. त्यामुळेच मालिका सतत टीआरपीच्या शर्यतीत टॉप 10 मध्ये दिसून यायची. मात्र आता मालिका आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. लवकरच ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दरम्यान मालिकेच्या शेवटच्या भागाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांवर आपली पकड निर्माण केली होती. मालिकेचा आगळावेगळा विषय प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला होता. मालिकेत यश आणि नेहाची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. विवाहित मात्र पतीपासून विभक्त झालेली नेहा जिला एक छोटीशी परी नावाची मुलगीसुद्धा असते. तर गर्भश्रीमंत असणारा, उच्चशिक्षित यश यांची ही हटके लव्हस्टोरी होती. या मालिकेत यश आणि नेहाची मुख्य भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरेने साकारली होती. तर परीची भूमिका मायरा वैकुळ या बालकलाकाराने साकारली होती. **(हे वाचा:** हातात सँडल घेऊन अनवाणी पायांनी भर रस्त्यात धावू लागली अभिनेत्री प्रार्थना बेहेर, Video Viral ) ही लोकप्रिय मालिका सध्या शेवटच्या टप्प्यावर आली आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता या मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रसारित केला जाणार हे निश्चित झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मालिका आता केवळ दोन ते तीन दिवसच प्रसारित केली जाणार आहे अर्थातच येत्या 22 जानेवारीला या मालिकेचा महाएपिसोड असणार आहे. आणि हा महाएपिसोडच मालिकेचा शेवटचा भाग असणार आहे. 22 जानेवारीला रात्री 9 वाजता झी टीव्हीवर हा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिका बंद होत असल्याने या मालिकेचे प्रेक्षक आणि कलाकारांचे चाहते नाराज आहेत. मालिका बंद केली जाऊ नये यासाठी अनेकजण कमेंट्स करत मालिका सुरु ठेवण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान अनेकांनी आम्ही नेहा, यश आणि परीला प्रचंड मिस करणार असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.मालिकेचा शेवट कसा असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. प्रार्थना बेहेरेचा हातात सॅन्डल घेऊन रस्त्यावर धावतानाचा व्हिडीओ समोर आल्यापासून सर्वच लास्ट एपिसोड पाहण्यासाठी आतुर आहेत. कारण अभिनेत्रीने हे आपल्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग असल्याचं म्हटलं होतं.
यश आणि नेहाची फ्रेश जोडी प्रेक्षकांना फारच आवडली होती. तर आपल्या गोड अभिनयाने आणि बोलक्या स्वभावाने परीने सर्वांचं मन जिंकलं होतं. या तिघांना प्रेक्षक भरभरुन प्रेम देत होते. मात्र मालिका अचानक बंद होत असल्याचं ऐकून चाहते नाराज झाले आहेत. यापूर्वीही सप्टेंबरमध्ये मालिका बंद होत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र नंतर असं काहीही होणार नसल्याचा खुलासा झाला होता. मात्र आता मालिका खरोखरच निरोप घेत आहे.