मुंबई, 2 एप्रिल- गुढीपाडव्याच्या (Gudhipadwa 2022 ) सणाचा उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. पारंपारिक वेशभुषेत नटून थटून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. यात मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार देखील मागे नाहीत. सर्वांच्या लाडक्या छोट्या परीनं म्हणजे मायरा वायकुळनं( myra vaikul latest video ) देखील गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा क्यूट व्हि़डिओ सोशल मीडियायवर व्हायरल होत आहे. मायरा वायकुळच्या इन्स्टा पेजला तिचा क्यूटवाला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मायरा गुढी उभारताना दिसत आहे. शिवाय तिनं सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.मायाराचा क्यूट व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की,“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वाचा ‘ही’ अभिनेत्री साकारणार मोठी ‘दुर्गा’, प्रसिद्ध हिंदी मालिकेत केलंय काम मायरा गुढी पाडव्यासाठी खास तयार देखील झाली आहे. निळ्या आणि केसरी रंगाचा सुंदर फ्रॉक तिनं घातला आहे. या पारंपारिक कपड्यात नेहमीसारकीच ती सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. तिचा हा क्यूट अंदाच चाहत्यांना देखील खूप आवडलेला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्याबद्दल प्रेम व्यक केलं आहे. वाचा- अनुष्काच्या Look वर विराट कोहली क्लीन बोल्ड, पत्नीला एकटक बघतच राहिला खेळाडू मायरचं नुकतचं कोलीवूड प्रॉडक्शन प्रस्तुत आई विना मला करमत नाही हे गाणं आलं आहे. या गाण्यात मायरा मुख्य भूमिकेत आहे. मायरा यामध्ये शाळेच्या गणवेशात दिसत आहे. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो ह्या लोकप्रिय गाण्याची गायिका दिया वाडकर हिने आई हे गाणं गायलं आहे. मायराच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणे, मुरडणे, रुसणे पाहायला खूपच मजा येते. तिचा अभिनय देखील अप्रतिम आहे. खरेतर या मालिकेआधी देखील तिचे अनेक चाहते होते. मायरा वायकुळचे. इन्स्टाग्रामवरही खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner World Of Myra and Family आणि नावाने मायराचे चॅनेल देखील आहे.
झी मराठीवरील अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका आहे. मालिकेत यशची भूमिका श्रेयस तळपदे तर नेहाची भूमिका प्रार्थना बहेरे साकरताना दिसत आहे. या मालिकेत छोट्या परीची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री मायरा वायकूळ आहे. फक्त आणि फक्त परीसाठी ही मालिका पाहणारे अनेक जण आहेत.