मुंबई, 13 फेब्रुवारी- झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका सध्या खूप गाजतेय. त्यामधील श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरेची (Prarthana Behere) जोडी आणि छोट्या परीचा निरागस अभिनय याची चर्चा घराघरात होत आहे. आता मालिका एका रंजक वळणावर आहे. यशने नेहासमोर प्रेमाली कबुली दिलेली आहे. नेहा मात्र त्याच्यावर नाराज असल्याचे दिसत आहे. मात्र सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. अशातच एका गोड गैरसमजुतीमुळे यश-नेहाचा व्हॅलेंटाईन डे (Valetine Day) अधिक खास होणार आहे. याचा नुकताच एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यश आणि नेहा ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडते. यशने जरी नेहासमोर प्रेमाची कबुली दिली असली तरी नेहा मात्र त्याचे प्रेम स्वीकरण्यास तयार नाही. मात्र हळूहळू का होईना नेहाला आता यशबद्दल प्रेम जाणवू लागलं आहे. त्यात व्हॅलेंटाईन डे सुरू आहे. सगळीकडं प्रेमाचं वारं वाहत आहे. अशातच नेहा आणि यश गार्डनमध्ये भेटतात. त्यावेळी तिथली काही मंडळी यशला ओळखतात. सोबत नेहाला पाहून सर्वांना वाटते याच मिसेस चौधरी आहेत. म्हणजे यशची पत्नी आणि मग सर्वजण या दोघांना एकत्र फोटो काढण्याचा आग्रह धरतात. यानिमित्त यश आणि नेहा जवळ येतात. काही चुकीच्या समजुतीमुळे का होईना यश आणि नेहा जवळ आहे. यानिमित्ताने त्यांचा व्हॅलेंटाईन डे खास बनला.
मागच्या काही दिवसांपासून यश नेहाला मनवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र नेहा यशचे ऐकण्यास तयार नाही. आता मात्र तिच्या मनात यशबद्दल प्रेम निर्माण होऊ लागलं आहे. यशचा अपघात झाल्यापासून नेहाच्या वागण्यात बदल झालेला दिसत आहे. आता नेहा आणि यश एकत्र पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. मात्र या दोघांना सिम्मी एकत्र येऊन देईल का याची चिंता सर्वांना लागली आहे. शिवाय नेहाचे सत्य समजल्यानंतर यशच्या आजोबांची काय प्रतिक्रिया असणार हे देखील पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

)







