मुंबई, 18 जानेवारी : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक सेलिब्रिटी जोड्या (celebrity couples) आहेत. त्यांच्यातील नात्याचं कायमच अनेकांना कौतुक असतं. त्यापैकीच एक म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना (Akshay Kumar and Twinkle khanna).
अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला तब्बल 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं अक्षयनं ट्विंकलसोबत एक सुरेख फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. यासोबत एक तितकाच सुंदर संदेशही त्यानं लिहिला आहे.
View this post on Instagram
अक्षयनं ट्विंकलसोबत घेतलेली एक सेल्फी शेअर केली आहे. यात ट्विंकल अक्षयच्या खांद्यावर आपलं डोकं ठेऊन स्मितहास्य करते आहे. अक्षयनं पांढरा शर्ट तर ट्विंकलनं निळा कुर्ता घातला आहे. हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला असून त्यावर लाईक्ससह कमेंट्सचाही पाऊस पडतो आहे.
अक्षयनं सेल्फी शेअर करताना लिहिलं, की आपल्या पार्टनरशिपला आता 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला माहीत आहे, तू माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेस. आपण एकदुसऱ्याला कधीच परिपूर्ण बनवत नाही. पण एकमेकांना सोबत करण्याचा मात्र पूर्ण प्रयत्न करतो. अक्षय पुढे लिहितो, की लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही तुला पाहून माझं हृदय तितक्याच वेगानं धडधडू लागतं. तू नेहमीच माझ्या काळजात राहतेस. लव यू टीना.'
ट्विंकल आणि अक्षयला मुलगा आरव आणि मुलगी नितारा अशी दोन गोड अपत्यं आहेत. अक्षयनं अनेकदा सांगितलं आहे, की मी बघताक्षणीच ट्विंकलच्या प्रेमात पडलो होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Instagram, Twinkle khanna