मुंबई, 27 नोव्हेंबर- मराठमोळी विनोदी अभिनेत्री म्हणून परिचित असलेली प्राजक्ता हनमघरच्या (prajakta hanamgar) घरी लवकरच पाळणा हलणार आहे. सोशल मीडियावरून तिनं ही गोड बातमी (good news) चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिनं तिच्या डोहाळजेवणाचे (baby shower ) फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. जरा विसावू या वळणावर’….असे कॅप्शन देऊन प्रजक्ताने नुकतेच आपल्या डोहाळजेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. प्राजक्ताने इन्स्टावर डोहाळजेवणाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती पतासोबत झोपळ्यावर झुलताना दिसत आहे. ती हिरव्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्राजक्ताने फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमधून साकारलेल्या तिच्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना खूपच भावल्या आहेत. अभिनेत्री प्राजक्ताचे बालपण मुंबईतच गेले. दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर आणि पुढे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधून तिने आपले शिक्षण घेतले. साधारण चार वर्षांपूर्वी बार्शी येथील रजत ढाळे यांच्यासोबत प्राजक्ताचा विवाह झाला. रजत ढाळे हे फार्मसिस्ट आहेत. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसि येथे ते कार्यरत होते.
वाचा : आधी केलं ब्लॉक नंतर व्हाटसअॅपवरून जुळलं प्रेम, आता Rakhi Sawant पतीसोबत बिग बॉसमध्ये करणार ‘सुहागरात’ प्राजक्ताने वादळवाट, पुणेरी मिसळ, शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिंकामध्ये काम केले आहे. तसेच प्राजक्ताने लूज कंट्रोल, वेडिंगचा शिनेमा, धुरळा हे चित्रपट केले आहेत. तर डब्बा गुल, कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, फु बाई फु सारखे विनोदी कार्यक्रम आपल्या विनोदी अभिनयाने तीने गाजवले . योगेश शिरसाट आणि प्राजक्ताची जोडी त्यांच्या विनोदी स्किटमधून प्रेक्षकांना खूपच भावली होती. अभिनयाबरोबरच प्रजक्ताने काही कुकरी शो होस्ट केले आहेत. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि खाऊ घालणे हे तिचे आवडीचे काम आहे. 1 एप्रिल 2022 रोजी प्रजक्ताने अभिनित केलेला हवाहवाई हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.