जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / वनिता खरात नंतर 'ही' अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली..

वनिता खरात नंतर 'ही' अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली..

वनिता खरात नंतर 'ही' अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली..

महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील कॉमेडी क्वीन वनिता खरातने काही दिवसापूर्वी लग्नगाठ बांधली. वनिता पाठोपाठ मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी- महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील कॉमेडी क्वीन वनिता खरातने काही दिवसापूर्वी लग्नगाठ बांधली. वनिता पाठोपाठ मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया पोस्ट करत आपल्याला जोडीदार सापडल्याची माहिती दिली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून सर्वांची आवडती शोना मॅडम म्हणजे रश्मी पाटील होय. रश्मी पाटीलने झी मराठीवरील कारभारी लयभारी या मालिकेत शोना मॅडमची भूमिका साकारली होती. आता तिला तिचा जोडीदार सापडला आहे. त्याच्यासोबतचे काही फोटो शेअर करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे. रश्मी पाटील ज्या मुलासोबत लग्न करणार आहे त्याचे नाव अक्षय आहे. जवळच्या खास नातेवाईक आणि मित्रमंडळींसमवेत लग्न ठरल्याची गोड बातमी शेअर करण्यासाठी ही सगळी मंडळी महाराजा कॅफेमध्ये एकत्रित जमली होती. यावेळी रश्मीने अक्षय सोबत काही खास फोटो काढले. Found him असे कॅप्शन देऊन लवकरच लग्न करत असल्याची बातमी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली. वाचा- शर्मिष्ठा राऊतनं केला डोक्यावरचा भार कमी, फोटो पाहून येईल कारण लक्षात! यावेळी रश्मी आणि अक्षय यांनी एकमेकांना अंगठी देखील घातली. मित्रमंडळीच्या साक्षीने या दोघांनी साखपुडा केल्याचे समोर आलं आहे. याचा देखील व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. रश्मीच्या या बातमीवर कारभारी लयभारीच्या कलाकारांनी तसेच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात

रश्मी ही पुण्यात वाढली. बालपण आणि शालेय शिक्षण पुण्यात झालं. लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची तिला आवड होती.घरातून कलाक्षेत्रात कोणीही नसलं तरीही घरच्यांनी तिच्या आवडीला प्रोत्साहन दिलं. तिच्या अनेक इव्हेंट्स मध्ये तिने लावणी सादर केलेली आहे. किंबहुना ही तिची एक ओळख बनलेली आहे. तिच्या युट्युब चॅनेल वरून तिचे लावणीतले नृत्याविष्कार पाहता येतात. रंगमंचावरून नृत्य सादर करत असताना तिने चित्रपटातही काम केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

इंद्रभुवन हा तिची भूमिका असलेला चित्रपट. तसेच एक गाव बारा भानगडी ही वेब सिरीजही तिने केलेली आहे. अभिनय, नृत्य यांशिवाय ती मॉडेलिंग करते. कला क्षेत्राशिवाय तिने स्वतःचं इंटिरियर डेकोरेटर म्हणून शिक्षण पूर्ण केलेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात