प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि टीआरपी रेसमध्ये पहिला क्रमांक गाठण्यासाठी मेकर्स नवनवीन ट्विस्ट आणत असतात. काही वेळा ते यामध्ये यशस्वी होतात तर काही वेळा हा डाव फसतो आणि मालिकेचा टीआरपी खाली घसरतो. आज पुन्हा एकदा मराठी मालिकांचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. पाहूया कोणत्या मालिकेने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.
आपण दहाव्या क्रमांकापासून पाहूया. गेल्या आठवड्यात नवव्या क्रमांकावर असलेली झी मराठीवरील मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' या आठवड्यात दहाव्या स्थानावर आहे.
तर गेल्यावेळी टॉप 10 मध्ये जागा न मिळवू शकलेली मालिका 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या आठवड्यात नवव्या स्थानावर आली आहे.
आणखी एका मालिकेने या आठवड्यात टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे. ती मालिका म्हणजे स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' होय. सध्या हि मालिका आठव्या क्रमांकावर आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. ही मालिका आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे.
तर गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.सहकुटुंब सहपरिवार आणि देवमाणूस या मालिकांना टॉप10 मध्ये यावेळी जागा मिळू शकली नाही.