अनेक हिंदी गाजलेल्या मालिका नव्या रूपात सादर होऊ लागल्या आहेत. तोच ट्रेंड आता मराठीत आला आहे. अगंबाई सासूबाई ही मालिकासुद्धा सीझन 2 म्हणून आता समोर येत आहे.
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'अगं बाई सासूबाई' आत्ता लवकरच 'अगं बाई सुनबाई' या रुपात परत येत आहे.
झी मराठी वरील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. अण्णा नाईक परत आपली दहशत माजवायला परत येत आहेत . भाग 1, 2 नंतर आता भाग 3 घेऊन ही मालिका झी मराठीवर पुनरागमन करत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील खाकी वर्दीची ताकद दाखवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारी मालिका 'लक्ष्य' सर्वांच्याच परिचयाची आहे. त्याच्याच आशयावर आधारित 'नवे लक्ष्य' ही मालिका नव्या चेहऱ्यांसह टीव्हीवर पुनरागमन करत आहे.
मराठी सोबत हिंदीसुद्धा काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे 'सीआयडी'. या मालिकेने तर सर्वात जास्त काळ चालणारी मालिका असा इतिहासचं रचला आहे. तब्बल 22 वर्षे चालणाऱ्या या मालिकेने 2018 मध्ये निरोप घेतला होता. मात्र प्रेक्षकांच्या प्रेमाखातर ही मालिका परत एकदा छोट्यापडद्यावर पुनरागमन करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दूरदर्शन काळातली 'वागले की दुनिया' 90 च्या दशकात 'सब' वाहिनीवरील पुन्हा आली. प्रेक्षकांच्या मनात तेव्हाही तिने घर केलं होतं. याच मालिकेने नव्या पिढीच्या नव्या गोष्टींसह भाग 2 च्या रुपात छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.