मुंबई, 30 नोव्हेंबर: कारभारी लई भारी (Karbhari Lai Bhari) या मालिकेने अत्यंत कमी वेळामध्ये तुफान लोकप्रियता मिळवली आहे. उत्तम कथानक त्यालाच साजेशी पात्र निवड यामुळे या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. वीरु आणि प्रियांकाची मैत्री दिवसेंदिवस छान खुलत आहे. पण तिने स्वत:चं एक सत्य वीरुपासून लपवून ठेवलं आहे. त्याचे परिणाम वीरुला भोगावे लागणार आहेत.
वीरु आणि पियूमध्ये नुकतीच दोस्ती झाली पण पियूने अजूनही तिची खरी ओळख वीरु पासून दडवून ठेवली आहे की ती अंकुशराव पाटलाची मुलगी आहे. पियूकडून नकळत घडलेल्या कृतीपायी राजवीर अडचणीत येणार आहे. पियूचे गावभर बॅनर लागतात. बॅनरमुळे ती स्वत:हून वीरुला सांगण्याआधी कळेल की मी अंकुशराव पाटलाची मुलगी आहे म्हणून पियूच तिच्या बॅनरला शेण लावते. आण नेमके तिथे वीरु आणि जग्गू पोहोचतात. जग्गूचा समज होतो की हे सगळं वीरुने केलं आहे. त्यामुळे दोघांत बाचाबाची होते. जग्गूसोबत आलेली मुलं वीरुवर हल्ला करुन त्याला पकडून आणतात. अंकुशरावला हा प्रकार कळल्याने तो देखील संतापतो. वीरुला कोंडून ठेवलं जातं. खरंतर प्रियांका, अंकुशराव, जग्गू आणि वीरुला खरं सांगण्यासाठी धडपडते पण तिचं कुणीच ऐकून घेत नाही. रात्रभर सूर्यवंशी घरातली मंडळी वीरुला शोधत फिरतात. अंकुशराव वीरुला सूर्यवंशी घरात टाकून जातो आणि दोन्ही घरात प्रचंड वाद होतो. अशावेळी पियू वीरुला तिची खरी ओळख सांगू शकेल का?
सेटवरचे काही फोटोज लीक झाले आहेत. यामध्ये वीरु आणि जग्गूमध्ये झालेली बाचाबाची दिसून येत आहे. शिवाय अंकुशराव पियू यांच्यासमोर वीरुला बांधून आणल्याचंही दिसत आहे. हिरोईनमुळे हिरोलाच मार खावा लागणार आहे. असा जबरदस्त हंगामा येत्या काही दिवसात कारभारी लईभारी या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Serials