जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बहिणीच्या कामगिरीवर सत्या मांजेरकरनं दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाला, 'गौरी तुला ..'

बहिणीच्या कामगिरीवर सत्या मांजेरकरनं दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाला, 'गौरी तुला ..'

बहिणीच्या कामगिरीवर सत्या मांजेरकरनं दिली अशी प्रतिक्रिया

बहिणीच्या कामगिरीवर सत्या मांजेरकरनं दिली अशी प्रतिक्रिया

पांघरुण या चित्रपटात महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च- मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नेहमी चर्चेत असतात. महेश मांजरेकरांना सत्या, सई आणि अश्वमी यांच्या सोबतच गौरी इंगवले ही सुध्दा लेक आहे. पांघरुण या चित्रपटात महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने तिचा भाऊ सत्या मांजरेकरने एक पोस्ट केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. सत्यानं नेमकं पोस्टमध्ये काय म्हटलं आहे? सत्याने ‘पांघरुण’ या चित्रपटाच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने त्याला कॅप्शन देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. “गौरी तुला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा अॅवॉर्ड मिळाला, त्याबद्दल तुझे खूप कौतुक”, असे सत्याने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या दे धक्का २ मध्येसुध्दा गौरी प्रमुख भूमिकेत होती. तर सत्या बद्दल बोलायचं झालं तर तो आगामी ऐेतिहासिक वेडात मराठे वीर दौडले सात या महेश मांजरेकर दिग्दर्शित बिग बजेट सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मात्र मागच्या काही दिवासांपासून सत्याला या सिनेमातून काढल्याची चर्चा रंगलेली आहे.

News18

सोशल मीडियावर रंगलेय वेगळीच चर्चा मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची काही महिन्यांपूर्वीच घोषणा झाली. या चित्रपटातून बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार मराठी पडद्यावर पाऊल टाकतोय. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. त्याचा लूकदेखील समोर आला होता.खरं तर चित्रपटातील सर्व कलाकारांचा लूक समोर आल्यानंतर शिवप्रेमींनी सत्या मांजरेकरच्या निवडीवर आक्षेप नोंदवला होता. त्याच्यावर सडकून टीका झाली होती. सत्या मांजरेकर छत्रपतींचा मावळा म्हणून शोभत नाही त्याला ही भूमिका देऊ नये, अशा शब्दांत अनेकांनी टीका केली होती. या विरोधामुळे महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलाला या भूमिकेतून काढून टाकल्याचे बोलले जात आहे.  सोशल मीडियावर  देखील चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप महेष मांजेरकर यावर काहीच बोलले नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

समोर आलेल्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण नुकताच या चित्रपटातील सर्व कलाकार जिममध्ये वर्कआउट करताना दिसले. अभिनेता आरोह वेलणकर त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने ‘टीम वर्क’ असे म्हणत सर्व कलाकारांचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर केला.यात सत्या मांजरेकर हा कुठेच दिसला नाही. दुसरीकडे आरोह या चित्रपटाच्या टीमसोबत जीम करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून सत्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्याच्याऐवजी आरोह वेलणकरची वर्णी चित्रपटात लागली असा अंदाज वर्तवला जातोय. आता यात किती तथ्य आहे, हे लवकरच स्पष्ट होईल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात