सचिन यांच्या ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने सचिन यांच्या बहिणीची म्हणजेच काननची व्यक्तिरेखा साकारली होती. निखळ हास्याची ती कानन म्हणजेच राजेश्वरी सचदेव आज काय करते हा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर राजेश्वरी ही एक अभिभिनेत्री, उत्तम गायिका आणि थियेटर आर्टिस्टसुद्धा आहे. राजेश्वरी ही मूळची पंजाबी आहे. राजेश्वरीने अभिनेता वरुण वडोलासोबत लग्न केल आहे. एका टीव्ही शोमध्ये राजेश्वरी आणि वरुणची ओळख झाली होती. वरुण वडोला हिंदी मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. राजेश्वरीने काही मोजक्या चित्रपटांत काम केलं आहे. 2018 मध्ये तिने ‘एक सांगायचय’ या चित्रपटातून मराठीमध्ये पुनरागमन केल आहे. राजेश्वरी आणि वरुण यांना एक मुलगासुद्धा आहे.