जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आईपण म्हणजे रोजचा दिवस परीक्षा....' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'आईपण म्हणजे रोजचा दिवस परीक्षा....' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'आईपण म्हणजे रोजचा दिवस परीक्षा....' अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

आई झाल्यापासून उर्मिला नेहमीच तिच्या मुलाबद्दल काहींना काही शेअर करत असते. आज तर मातृदिन (Mothers Day 2022) आहे. यानिमित्त उर्मिलानं एक खास पोसट शेअर केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 मे- मराठोमोळी अभिनेत्री आणि लोकप्रिय यूट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. उर्मिलाने ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या गोष्टीची माहिती तिने सोशल मीडियावर दिली होती. तिने तिच्या मुलासोबत काही गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या मुलाचं नाव अथांग असं आहे. आई झाल्यापासून उर्मिला नेहमीच तिच्या मुलाबद्दल काहींना काही शेअर करत असते. आज तर मातृदिन ( Mothers Day 2023 ) आहे. यानिमित्त उर्मिलानं एक खास पोसट शेअर केली आहे. तिची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. उर्मिला निंबाळकरनं तिच्या इन्स्टाला तिच्या मुलासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सोबत तिनं म्हटलं आहे की, हा माझा पहिला मदर्स डे आहे. सतत आनंदात असूनही मात्र, रोजचा दिवस परीक्षा असल्यासारखं☺️ तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला मदर्स डेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय तिच्या फोटोचं देखील कौतुक केलं आहे. वाचा- चॅलेंज! ओळखा पाहू फोटोतील या चिमुकलीला, आज मराठी मनावर गाजवतेय अधिराज्य आईचा जॉब हा कधीही न संपणारा असाच असतो. प्रत्येकवेळी तिची ड्युटीही सुरूच असते. मग ती अभिनेत्री असो की सर्वसामान्य महिला. आजकाल करीना कपूरपासून ते अशा अनेक अभिनेत्री दिसतात ज्या मुलाच्या जन्मानंतर काम करताना दिसतात. मुलाला घेऊन शुटींग करताना दिसतात. आईसाठी प्रत्येक दिवस परीक्षाच असतो. आपलं मुलं कधी काय करेल व कधी काय विचारेल याचा अंदाज नसतो. त्यामुळे नेहमीच तिला जागरूक राहावं लागतं. आपल्या मुलांना काय हवं काय नको हे पाहावं लागतं.

जाहिरात

उर्मिलाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने दुहेरी, एक तारा, दिया और बाती या मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिला प्रेग्नेंट होती तेव्हा अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. यासोबतच डोहाळे जेवणाचे अनेक फोटो व एक छानसा व्हिडीओ देखील तिन सोशल मीडियावर शेअर केला होता. उर्मिलाला उर्मिलाला सर्वजण एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतात मात्र ती एक मराठीमधील प्रसिद्ध अशी युट्यूबर देखील आहे. तिच्या यूट्यूब चॅनलवर ती ब्यूटी, लाईफस्टाईल अशा विविधा विषयावर माहिती शेअर करत असते व काही टिप्स देखील देत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात