जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान...', सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

'महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान...', सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

'महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान...', सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे. सगळीकडे शिवजयंतीचा (Shiv Jayanti ) उत्साह पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं ( Sonalee Kulkarni )देखील यानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 फेब्रुवारी- Shiv Jayanti 2022: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे. सगळीकडे शिवजयंतीचा (Shiv Jayanti )  उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक मराठी सेलेब्स शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून मानवंदना देत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं **(  Sonalee Kulkarni )**देखील यानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. सोनाली कुलकर्णीने पोस्ट करत म्हटलं आहे की, " महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान, आपुलकी,हे सगळेच भाव @saneshashank ने अचूक टिपले या डोळ्यांमध्ये म्हाणून हा फोटो आज, इथे share करत आहे…कारण श्री छत्रपतींविषयी या सगळ्याच भावना आपण सगळेच share करतो ना." #शिवजयंती #जयभवानी #जयशिवराय🚩#छत्रपती_शिवाजी_महाराज असे हॅशटॅग तिने या पोस्टसोबत दिले आहेत. सोनालीने या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सोनालीच्या मागे छत्रपती शिवरायांची एक सुरेख मूर्ती पाहायला मिळते आहे.

जाहिरात

सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. यंदाचे वर्ष सोनालीसाठी खास आहे. कारण लग्ननंतर आलेले तिचे पांडू आणि झिम्मा हे दोन सिनेमे यशस्वी झाले आहेत. या सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. वाचा-  शिवजयंतीनिमित्त रवी जाधव यांची घोषणा, लवकर येणार ‘बाल शिवाजी’ भेटीला शिवजयंतीनिमित्त अनेक मराठी सेलेब्सनी खास फोटोशुट केलं आहे. बिग बॉस फेम मीन शाह, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी महांगडे या कलाकारांनी शिवजयंतीनिमित्त विशेष फोटोशुट केले आहे. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात