मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एक अष्टपैलू अभिनेत्री समजली जाते. सोनाली नेहमीचं साडीमध्ये वावरताना दिसते. सोनालीला साडीवर विशेष प्रेम आहे, हे अनेक लोकांना माहिती नसेल. सोनाली नेहमीचं विविध सुंदर साड्यांमध्ये आपल्याला दिसून येते. कोणताही कार्यक्रम असला किंवा पुरस्कार सोहळा सोनाली नेहमीच आकर्षक अशा साडीमध्ये पाहायला मिळते. इतकचं नव्हे तर, सोनालीकडे चक्क ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची साडी आहे. स्मिताजींची साडी त्यांच्या बहिणीने सोनालीला भेट म्हणून दिली आहे. आणि सोनालीने ती एका मौल्यवान खजिन्या सारखी जपली आहे. सोनाली सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेयर करत असते. मात्र यातील बरेच फोटो हे साडीवरचं असतात. आणि चाहत्यांना सुद्धा सोनालीचा साडी लुक मोठ्या प्रमाणात आवडतो.