• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अग्गंबाई! Karwa Chauth साठी सोनाली कुलकर्णी थेट दुबईत; नवऱ्यासाठी शेअर केला Emotional मेसेज

अग्गंबाई! Karwa Chauth साठी सोनाली कुलकर्णी थेट दुबईत; नवऱ्यासाठी शेअर केला Emotional मेसेज

आपली मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni )यंदा पहिला करवा चौथ आहे. मग काय सोनालीने यासाठी थेट दुबई घातली आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 ऑक्टोबर : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला सुवासिनी महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत ( Karwa Chauth Vrat)करतात. यंदाच्या वर्षी करवा चौथ आज, 24 ऑक्टोबर रोजी साजरा होतोय. अनेक सेलेब्स देखील ही पूजा घऱी आयोजीत करतात. आपली मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni )यंदा पहिला करवा चौथ आहे. मग काय सोनालीने यासाठी थेट दुबई घातली आहे.  पती कुणालसोबत ती देखील करवा चौथ सेलिब्रेट करणार आहे. सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni Instagram ) कुणालसोबत एक सुंदर फोटो शेअर करत हम आपके दिल मे रहते है.. . असं म्हटलं आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले आहे की,आज हमारी पहली करवा चौथ है …मी मुंबईहून दुबईत पोहचलीये,नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईलयाची खात्री आहे.
  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतंच तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 7 मे रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.यानंतर सोनाली पती कुणालसोबत मालदिवला गेली होती. यावेळी तिने पतीसोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले होते. या फोटोत सोनालीने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली होती. तिच्या या लूकची सोबत तिच्या मंगळसूत्राची देखील त्यावेळी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. वाचा: Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरातून आज दादूस होणार OUT?जाणून घ्या डिटेल्स सोनाली कामानिमित्त मुंबईत राहते. त्यामुळे आज ती दुबईला गेली आहे.  तिने कुणालसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघेही खूपच छान दिसत आहेत.आपल्या अभिनयासोबतच नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. सोनालीच्या प्रत्येक प्रोजेक्टची चाहत्यांना खुप उत्सुकता असते. अलीकडे ती सोशल मीडियावर तिच्या फिटनेसमुळे चांगलीच चर्चेत आहे. वाचा: घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO बॉलिवू़डमध्ये अनेक अभिनेत्री करवा चौथची पूजा करतात. शिल्पा शेट्ट, रविना टंडन तसेच इतर काही बॉलिवू़ड अभिनेत्री मिळून ही पूजा करताना दिसतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published: