जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / या मराठमोळ्या क्युट कपलचे हनिमून फोटो झाले व्हायरल; खास ठिकाणी केलं एंजॉय

या मराठमोळ्या क्युट कपलचे हनिमून फोटो झाले व्हायरल; खास ठिकाणी केलं एंजॉय

या मराठमोळ्या क्युट कपलचे हनिमून फोटो झाले व्हायरल; खास ठिकाणी केलं एंजॉय

सोशल मीडियावर आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजचे फोटोज पहायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. या ग्लॅमरस कपलचे ताजे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 जानेवारी : सेलिब्रिटी तारे-तारकांचे (celebrity actor-actresses) ग्लॅमरस आयुष्य (glamorous life)पाहून अनेकांना खूप हेवा वाटतो. मात्र शुटिंगचे (shooting) अनिश्चित तास आणि दिवसरात्र फिटनेस व इतर गोष्टींवर करावी लागणारी मेहनत यातून कलावंतांच्या वाट्याला निवांत क्षण खूपच कमीवेळा येतात. या वास्तवाची अनेकांना कल्पना नसते. मात्र हे सेलिब्रिटीज ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ या तत्वावर काम करतात. जेव्हा केव्हा थोडेबहुत निवांत क्षण मिळतात, तसे ते या क्षणाचा आनंद मनमुराद लुटतात. याच मराठी सेलिब्रिटीजपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) . शर्मिष्ठानं ऑक्टोबर महिन्यात तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधली(marriage). मात्र लग्नानंतर तिला लगेच शूटिंगच्या  शेड्युलमध्ये बांधून घ्यावं लागलं. शिवाय कोरोनाच्या काळात प्रवासावरही बंधनं आली होती. मग या कपलनं थोडं थांबायचं ठरवलं. तेव्हा दोघांनी कुठलंच हनिमून (honeymoon) प्लॅनिंग केलं नाही. मात्र हळूहळू सगळं पूर्ववत होत असताना दोघांना कामातूनही थोडा निवांत वेळ मिळाला. लगोलग दोघांनी एक मस्त हनिमून ट्रिप प्लॅन केली. मालदीव (Maldivs) इथं दोघांनीही एकमेकांसह खूप चांगला वेळ घालवला. या मस्त ट्रीपचे (trip) फोटो शर्मिष्ठानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram account) शेअर केले आहेत.

जाहिरात

शर्मिष्ठा सोशल मीडियावर (social media) अतिशय सक्रिय असते. तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससह अनेक बाबींची माहिती आणि फोटोज, व्हीडिओज ती इथे अपलोड करत असे. अगदी लग्न ठरल्यापासून ते प्रत्यक्ष लग्नापर्यंतच्या सगळ्या गोष्टी तिनं आपल्या चाहत्यांसाठी (fans) इथं शेअर केल्या होत्या.

तेजस हा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. शर्मिष्ठाची बहीण सुप्रिया हिनं या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली होती. पहिल्या भेटीतच तेजसला शर्मिष्ठा आवडली होती.

जाहिरात

या क्युट कपलचे आकर्षक फोटो चाहत्यांना खूप आवडत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात