मुंबई, 4 मार्च- अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या तिचा स्वतःचा वेळ एण्जॉय करताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये ती शेवटची दिसली. या मालिकेमधील तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. प्रार्थनानं नुकताच तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते मात्र तिच्या प्रेमात पडले आहेत. प्रार्थना बेहरेनं नुकताच तिचा न्यू लूक चाहत्यांच्यासोबत शेअर केला आहे. यामध्ये तिनं नवीन हेअरकट केलेला दिसत आहे. शिवाय तिनं केसांना कलर देखील केला आहे. तिचा हा शाईनी आणि सिल्की हेअरकट पाहून अनेकांनी कुठला हेअरकट..असं म्हणत हेअरकटचं नाव विचारलं आहे. अनेकांनी तिच्या या नवीन लूकला पसंती दर्शवली आहे. वाचा- ‘मला बिग बॉसच्या आठवणींत अडकून पडायचं नाही’ किरण माने असं का म्हणाले? प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सेटवरील धमालमस्तीचे अनेक व्हिडिओही ती नेहमी शेअर करत होती. चाहत्यांची तिला चांगली पसंती मिळत असते.
.प्रार्थना बेहरे सध्या सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये ती शेवटची दिसली होती. या मालिकेमधील तिच्या नेहा या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेमुळे तिला छोटया पडद्यावर एक वेगळी ओळख मिळाली. प्रार्थनाने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. मालिका, सिनेमा, इव्हेंट, फोटोशूट यातून वेळ मिळाला की प्रार्थनाचा रिल्स किंवा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करायला तिला खूप आवडतं.
प्रार्थना बेहरे नुकतीच तिच्या गर्ल गॅंगसोबत सुट्टयांचा आनंद घेताना दिसली होती. या ट्रीपचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी चाहत्यांसह सेलेब्सने देखील यावर कमेंट केल्या होत्या. विशेष म्हणजे अभिनेत्री आणि प्रार्थनाची जवळची मैत्रीण सोनाली कुलकर्णी हिनं देखील यावर कमेंट केली होती.