मुंबई, 1 जुलै- आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. प्राजक्तानं तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्राजक्तानं नवीन घर घेतल आहे आणि तेही तिच्या आवडत्या शहरात. याबद्दल ई टाईम्सने देखील वृत्त दिलं आहे. प्राजक्तानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्राजक्तानं पुण्यात तिचं स्वप्नातलं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर प्राजक्तानं घराच्या पाटीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यावरती प्राजक्ता माळी असं लिहिलं आहे सोबत तिच्या घराचा नंबर 1704 असा देखील लिहिला आहे. तिच्या या ड्रीम होमची पाटी खूपच सुंदर आहे. वाचा- बाईपण भारी देवा पाहायला गेले भावोजी; थिएटरबाहेर येताच केदार शिंदेंना मारली मिठी ई टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, प्राजक्ता मागच्या काही दिवासांपासून घराच्या शोधात होती. तिनं अनेक प्रोजेक्ट देखील पाहिले होते. पण तिला पुण्यातील वातावरण आणि इमारातीचे बांधकाम खूप आवडले, त्यामुळे प्राजक्तानं पुण्यात फ्लॅट बुक केला. तिला या फ्लॅटचा ताबा 2 वर्षांनी मिळणार आहे. प्राजक्ता माळीनं नुकताच तिचा प्राजक्ताराज हा दागिन्याचा ब्रॅण्ड लॉंच केला आहे. सोशल मीडियावर याबद्दल माहिती देत असते. तिच्या प्राजक्तराजच्या दागिन्याला लोकांची चांगली पसंती मिळत आहे. पारंपरिक दागिने याची खासियत आहे. अनेक कार्यक्रमात प्राजक्ता हेच दागिने घालत असते.
प्राजक्ता माळी म्हणजे सौंदर्याची खाण आहे. तिच्या हटके स्टाईलिंगचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते. त्यामुळे चाहतेही तिच्या फोटोंवर कमेंट्स करताना दिसतात. प्राजक्तानं मराठी मालिकांतून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. तेव्हा ती अनेक लोकप्रिय मराठी मालिकांतून दिसली होती. त्यानंतर आता ती वेबसिरिज, मराठी चित्रपट, नाटक, जाहिराती, टेलिव्हिजन यांसारख्या हरएक माध्यमांवर झळकताना दिसते आहे.
सोशल मीडियावरही तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते त्यामुळे तिच्या लोकप्रियतेतही फार वाढ झाली आहे. इन्टाग्रामवरही तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. तिचे फोटोशूटही ते शेअर करताना दिसते ज्यात ती अत्यंत ग्लॅमरस दिसते.

)







