छोट्या पडद्यावरील भाभी जी घर पर हैं (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेतील अनिता भाभीचा शोध पूर्ण झाला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून गौरी खान (Gauri Khan) या भूमिकेसाठी योग्य अभिनेत्रीच्या शोधात होती. या रोलसाठी अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं चर्चेत आली होती. शेवटी सौम्या टंडनच्या (Saumya Tandon) जागी अभिनेत्री नेहा पेंडसेंची (Nehha Pendse) वर्णी लागली आहे.
भाभी जी घर पर हैं या मालिकेसाठी दिग्दर्शक संजय कोहली यांनी आधी सौम्या टंडनलाच विचारणा केली होती. पण ती मालिका सोडून गेल्यानंतर निर्मात्यांनी मराठमोळ्या नेहा पेंडसेला विचारणा केली.
सुरुवातीला नेहाने चक्क नकार दिला होता. त्यामुळे निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रींचा शोध सुरू केला. पण 4 महिन्यांनी निर्मात्यांनी पुन्हा नेहाशी संपर्क केला तेव्हा तिने या प्रोजेक्टला होकार दिला. आता लवकरच नेहा शूटिंगला सुरूवात करेल.
नेहा पेंडसेचा संजय कोहली यांच्यासोबतचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. या आधीही नेहाने ‘मे आय कम इन मॅडम’ या शो मध्ये लीड रोल केला होता. ही मालिकादेखील खूप गाजली होती.
सौम्या टंडनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या मालिकेला राम राम ठोकला होता. जवळजवळ 5 वर्ष मालिकेत काम केल्यानंतर तिने अनिता भाभीची भूमिका सोडण्याचा निर्णय घेतला.
नेहा पेंडसेच्या आधी शेफाली जरीवाला हिचं नाव या मालिकेसाठी घेतलं जात होतं. शेफाली जरीवाला कांटा लगा या गाण्यातून काही वर्षांपूर्वी झळकली होती.