मुंबई, 24 मे- गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे ( Ketaki Chitale Case ) हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं तिला चांगल महागात पडलं आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, केतकी चितळे ला 7 जून पर्यंत ठाणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 2020 च्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालईन कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात आरोपीचे वकील वसंत बनसोडे जामीन अर्ज दाखल केला आहे.नवी मुंबईमधील रबाळे येथे दाखल असलेल्या अॅट्रोसिटी गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्याने केतकी चितळे ला पुन्हा ठाणे कोर्टात हजर करण्यात आले होते. थोड्याच वेळात सुनवाईला सुरवात होणार आहे. नवी मुंबई पोलीस केतकी चितळेची पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. न्यायालयच्या सुनावणी कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2020 साली केतकी चितळे वर रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत पोस्ट करत खळबळ माजविली होती. त्यांनतर सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ माजला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







