जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मिस्टर शाह तुम्ही कौतुकास पात्र आहात...' हृता दुर्गुळेनं नवऱ्याचं 'या' कारणासाठी केलं अभिनंदन

'मिस्टर शाह तुम्ही कौतुकास पात्र आहात...' हृता दुर्गुळेनं नवऱ्याचं 'या' कारणासाठी केलं अभिनंदन

हृता दुर्गुळेनं नवऱ्याचं 'या' कारणासाठी केलं अभिनंदन

हृता दुर्गुळेनं नवऱ्याचं 'या' कारणासाठी केलं अभिनंदन

. प्रतीक आणि हृता अनेकदा सोशल मिडीयावर रोमँटीक फोटो पोस्ट करत असतात. नुकतंच हृताने तिच्या नवऱ्याचं अभिनंदन केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई, 4 जुलै-**अभिनेत्री हृता दुर्गुळे ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. ह्रताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. हृताने वर्षभरापूर्वी तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शाह सोबत लग्न केलं. प्रतीक आणि हृता अनेकदा सोशल मिडीयावर रोमँटीक फोटो पोस्ट करत असतात. नुकतंच हृताने तिच्या नवऱ्याचं अभिनंदन केलं आहे. हृताने सोशल मिडीयावर प्रतीकसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. यात त्याने प्रतीकचं अभिनंदन केलंय. हृता लिहीते.. मिस्टर शाह तुमच्या नवीन शोबद्दल अभिनंदन.. तुम्हा सर्वांकडून मिळणारे प्रेम आणि कौतुक पाहून मला खूप आनंद होतो. आपण या कौतुकास पात्र आहात! इतका अभिमान आहे! फक्त इथून पुढे कायम वरच जायचं आहे! आयुष्याभरासाठी तुझा जयजयकार करणारी चियरलीडर" अशी पोस्ट हृताने केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वाचा- आता कुठे आहे परदेसी-परदेसी गर्ल; आमिर खानबरोबर केला होता रोमान्स हृता दुर्गुळेच्या कामाबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. हृताने दुर्वा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती फुलपाखरु या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. हृताने अनन्या आणि टाइमपास 3 या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. मोठ्या पडद्यावर देखील ह्रताच्या अभिनयाचे कौतुक झालं.

News18लोकमत
News18लोकमत

प्रतिकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.‘बेहद २’, ‘बहू बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘तेरी मेरी एक जिंदड़ी’ या मालिकांसाठी त्याने काम केले आहे. आता प्रतीक शाह निर्मित शिव शक्ती ही नवी मालिका झी टीव्हीवर सुरु झालीय. यासाठी ह्रतानं नवऱ्याचे भरभरून कौतुक केलं आहे.

जाहिरात

हृताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केली होती. हृता ही मूळची कोकणातली मात्र ती लहानाची मोठी झाली ती मुंबईत झाली. रामणारायन रुईया कॉलेजमधून शिक्षण घेत असताना तिला अभिनय क्षेत्राची ओढ लागली. हृता दुर्गुळे हिने ‘फुलपाखरू’ या मालिकेत वैदेही हे पात्र साकारलं. या पात्राने तिला महाराष्ट्रातल्या घरा-घरात पोहोचवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात