मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मुलांसारखा पर डे मिळू देत..' गौतमी देशपांडेनं व्यक्त केली खंत

'मुलांसारखा पर डे मिळू देत..' गौतमी देशपांडेनं व्यक्त केली खंत

 ‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. आता तिची एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.

‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. आता तिची एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.

‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. आता तिची एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 मार्च, ‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री गौतमी देशपांडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. गौतमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. गौतमी उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती चांगली गायिका देखील आहे. ती सोशल मीडियावर तिचे गायनाचे व्हिडिओ देखील शेअर करत असते. एकूणच काय ती सोशल मीडियावर चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. आता तिची एक इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे.

काल जगभरात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. काल महिला दिनानिमित्त गौतमी देशपांडेने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिलं, “महिला दिनाच्या शुभेच्छा! मुलींना पण मुलांसारखी त्या डिझर्व करत असलेली सॅलरी आणि पर डे मिळू देत…बाकी काही त्रास नाहीत आयुष्यात.”आता तिची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

वाचा-'' ..म्हणून आई बडवायची'', हेमांगीनं सतीश कौशिक यांना सांगितला होता 'तो' किस्सा

गौतमी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध बहिणीपैकी एक देशपांडे सिस्टर्स म्हणजे मृण्मयी आणि गौतमी या दोघी बऱ्याचदा चर्चेत येत असतात तेही सोशल मीडियावरील मजेशीर व्हिडिओंमुळे. मात्र आता अभिनेत्रींसोबतच या दोघीही आता उद्योजिका म्हणजेच Business Women झाल्यात. होय नुकताच मृण्मयी आणि गौतमीने बिझनेस सुरू केला आहे. निल अॅण्ड मोमो असं त्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे. यामध्ये हॅण्डमेड साबण गौतमी आणि मृण्मयी बनवून विकत आहेत.

मृण्मयी आणि गौतमी यांचं नातं खूप खास आहे. या दोघी बहिणी एकमेकांची फजिती करायची एकही संधी सोडत नाहीत. सध्या त्यांनी एक नवा कार्यक्रम सुरु केला आहे ज्यात मोठी बहीण वर्सर्स लहान बहीण असे एकमेकांबद्दलच्या गोड तक्रारी त्या रील्सच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांच्या या रील्सना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात मृण्मयी गौतमीचे किस्से सांगून तिला तोंडावर पाडते तर गौतमी सुद्धा मागे न हटता मृण्मयीची फजिती करते.

गौतमीच्या कामाबद्दल सांगायचे तर ती ‘माझा होशील ना’ या मालिकेनंतर कोणत्या नवीन मालिकेत दिसली आहे. प्रेक्षक तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial