जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / IIFA: विदेशी धरतीवर अवतरली मराठमोळी अप्सरा, अमृता खानविलकर देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर

IIFA: विदेशी धरतीवर अवतरली मराठमोळी अप्सरा, अमृता खानविलकर देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर

IIFA: विदेशी धरतीवर अवतरली मराठमोळी अप्सरा, अमृता खानविलकर देतेय बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर

काल या सोहळ्याचा पहिला दिवस पार पडला. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच कलाकारांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये एक मराठमोळा चेहरासुद्धा होता ज्याची जोरदार चर्चा होत आहे. आणि हा चेहरा इतर कुणी नसून मराठमोळी अप्सरा अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 जून-   सध्या सर्वत्र आयफा पुरस्कार  (IIFA)  सोहळ्याची चर्चा सुरु आहे. कालपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात भाग घेण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी रवाना झाले आहेत. हा पुरस्कार सोहळा अबू-धाबीमध्ये पार पडत आहे. काल या सोहळ्याचा पहिला दिवस पार पडला. यामध्ये सहभागी झालेल्या सर्वच कलाकारांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये एक मराठमोळा चेहरासुद्धा होता ज्याची जोरदार चर्चा होत आहे. आणि हा चेहरा इतर कुणी नसून मराठमोळी अप्सरा अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी आबू-धाबीला रवाना झाली आहे. या दरम्यान अमृताचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. यामध्ये ती एयरपोर्टवर दिसून आली होती. त्यांनतर आता आयफा सोहळ्या दरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कालपासून या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक सेलेब्रेटींचा ग्रीन कार्पेट लुक समोर आला आहे. अमृता खानविलकरनेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

जाहिरात

या व्हायरल व्हिडीओमध्ये अमृता ब्ल्यू अँड ब्लॅक वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसून येत आहे. अमृताने आयफाच्या पहिल्या दिवशी सुंदर असा आऊटफिट परिधान करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सोबतच अमृता आपल्या वेस्टर्न आऊटफिट्समध्ये विविध पोजसुद्धा देत आहे. यासोबतच अमृताने केसांचा बन बांधला आहे. आणि हलकासा मेकअप करत आपला आयफा लुक कम्प्लिट केला आहे. अमृताचे हे व्हायरल व्हिडीओ पाहून एकच वाक्य चाहत्यांच्या मनात आहे, तो म्हणजे विदेशी धरतीवर अवतरली मराठमोळी अप्सरा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात