जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील गाजत असलेलं 'हे' गाणं, सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील गाजत असलेलं 'हे' गाणं, सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील अत्यंत गाजत असलेलं गाणं

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लिहिलं आहे ‘बाईपण भारी देवा’तील अत्यंत गाजत असलेलं गाणं

बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील एक गाणं सध्या खूप गाजत आहे. विशेष म्हणजे हे गाणं मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने लिहिलं आहे. मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून या अभिनेत्रीकडं पाहिलं जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 जुलै- सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांचीच चलती आहे. मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आलेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण आदिपुरुषसारख्या बिग बजेट सिनेमाला दणकून पाडत मराठी सिनेमानं नाव कमावलं आहे. एकामागोमाग एक मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. काही काळापूर्वी आलेल्या रावरंभा, महाराष्ट्र शाहीर या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पण आता आलेल्या एका मराठी चित्रपटानं मात्र रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटातील एक गाणं सध्या खूप गाजत आहे. विशेष म्हणजे हे गाणं मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने लिहिलं आहे. मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणून या अभिनेत्रीकडं पाहिलं जाते. दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील ‘मंगळागौर’ या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या गाण्याने यूट्यूबवर 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळविले आहेत. या गाण्यामध्ये सर्व अभिनेत्री मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसत आहेत. या गाण्याला महिला वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याला साई-पियुष यांनी संगीतबद्ध केलं असून सावनी रवींद्रने हे गाणं गायलं आहे. तर या गाण्याचे बोल म्हणजे शब्द अभिनेत्री अदिती द्रविडने लिहिले आहेत. अदिती आतापर्यंत अनेक मालिका-चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या गाण्याच्या निमित्ताने तिच्यातील एक वेगळे टॅलेंट समोर आलं आहे.

News18

आदितीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तिनं इन्स्टावर या गाण्याची लिंक शेअर करत लिहिलं, मी लिहिलेलं गाणं.. ऐकलं किंवा पाहिलं नसेल तर नक्की पाहा. या गाण्याने यूट्यूबवर 1 मिलियन व्ह्यूज पूर्ण केलेच आहेत आणि त्याबरोबरच हे गाणं अजूनही यूट्यूबवर ट्रेंड करत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने मिळाली लोकप्रियता अभिनेत्री आदिती द्रविडने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून अभिनेत्री आदिती द्रविड ही लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली.सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये अदितीनं नंदिनी ही भूमिका साकारली होती.‘या गोजिरवाण्यात घरात’ या नाटकात तिने प्रमुख भूमिका केली आहे. ‘या गोजिरवाण्यात घरात’ या नाटकातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे 2017 साली संस्कृती कलादर्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

जाहिरात

अदितीने पुण्यातील भारती विद्यापीठामधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. तिने भरतनाटयममध्ये एमए केलं आहे. तसंच गंधर्व महाविद्यालयाच्या विशारद पर्यंतच्या परीक्षांमद्धे ती अव्वल गुणांसह प्रथम श्रेणीमद्धे उत्तीर्ण झाली. इयत्ता पाचवीत असल्यापासून अदितीने गुरू स्वाती दैठणकर यांच्याकडे नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात