मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेचं (Abhidnya Bhave) गुरुवार 7 जानेवारी रोजी लग्न होणार आहे. तिच्या लग्नाच्या आधीचे विधी सुरू झाले आहेत. अभिज्ञाचे मेहंदी आणि ग्रहमखाचे विधी दणक्यात पार पडले आहेत.
अभिज्ञा सध्या रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसून येत आहे. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
अभिज्ञाच्या मेहंदी सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तेजस्वीनी पंडित, मयुरी देशमुख, साईनाथ, श्रेया बुगडे असे इंडस्ट्रीमधील जवळचे मित्र-मैत्रिणी तिला शुभेच्छा देण्यास हजर होते.
मेहंदीसाठी अभिज्ञाने फुलांचे दागिने आणि पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. या वेशात ती अतिशय क्यूट दिसत होती.