मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेची ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये वर्णी लागली आहे. असं काही दिवसांपूर्वी आम्ही सांगितल होतं. आत्ता अभिज्ञाचा सेटवरील व्हिडीओदेखील समोर आला आहे. नुकताच अभिज्ञा आणि अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मजेशीर रील शेयर केला आहे. आणि हा व्हिडीओ ‘पवित्र रिश्ता 2’ च्या शुटींगदरम्यानचा आहे. आपल्या 2 लाडक्या मराठमोळ्या अभिनेत्रींना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. या दोघींचा हा धम्माल व्हिडीओ सर्वांनाचं पसंत पडत आहे. (हे वाचा: HBD: सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडशी आहे कियारा आडवाणीचं खास नातं) ‘पवित्र रिश्ता 2’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या घोषणेनंतर अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. ‘पवित्र रिश्ता’ मधून अभिनेता सुशांत आणि अंकिताने मुख्य कलाकाराच्या भूमिकेत अभिनयाला सुरुवात केली होती. या मालिकेतील सर्व कलाकारांना मोठी लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेमुळे अर्चना आणि मानवची जोडी प्रचंड प्रसिद्ध झाली होती. मालिकेमुळे हे दोघेही रियल लाईफ कपल बनले होते. आत्ता सुशांतच्या निधनानंतर पुन्हा एकदा ही मालिका परत येत आहे. मात्र चाहत्यांकडून या मालिकेला विरोधही दर्शवला जात आहे. सुशांतची जागा कोणताच दुसरा कलाकार घेऊ शकत नाही असं म्हटलं जातं आहे. सध्या ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये अभिनेता शाहीर शेख मानवच्या भूमिकेत दिसणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.