मुंबई, 8 मे- मातृत्व स्त्रीला निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आई या शब्दाभोवती सगळं विश्वचं फिरताना दिसते. आज याच मातृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. मदर्स डे (Mothers Day 2022) प्रत्येक आईला समर्पित असतो. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात मदर्स डे साजरा केला जातो 8 मे हा जागतिक स्तरावर मदर्स डे म्हणजेच मातृदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जण आजचा दिवस आपल्या आईसाठी खास बनवण्याच प्रयत्न करत आहे. मराठी कलाकार देखील यात मागे नाहीत. अभिनेत्री प्रिया बापटनं ( Priya Bapat ) देखील मदर्स डेनिमित्ता आपल्या आई वडिलांचा फोटो शेअर करत भावुक अशी पोस्ट लिहिली आहे. प्रिया बापटनं तिच्या बालपणीचा एक आई वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. शिवाय़ दुसऱ्या फोटोत तिचे आई वडील दोघे दिसत आहेत. तिनं फोटो शेअर करत म्हटलं आहे की, प्रिय आई - बाबा, बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच आणि कायम असाल. पण, तुमच्या आणि आईच्या ३८ वर्षांच्या संसारात तुम्ही सर्वांत बेस्ट होतात. आर्थिक बाजू तर तुम्ही सांभाळलीच पण सांसारिक सर्व जबाबदार्यांमधे तुमच्या आणि आईच्या पार्टनरशिपला तोड नाही. वाचा- भारती सिंह ते देबिना बॅनर्जी या टीव्ही अभिनेत्रींचा यंदा पहिलाच Mother’s Day मुलांचे लाडही दोघांनीही केले आणि आोरडाही दोघांनीही दिला. शाबासकी, कौतुक दोघांनी केलं. अगदी आई घरी नसताना स्वयंपाकाही केलात आणि कधीही अवलंबून न राहण्याची शिकवण दिलीत. आर्थिक अडचण आोढवल्यावर मॅट्रीकही न झालेली आईने घराबाहेर पडून तुमच्या बरोबरीने काम करून आर्थिक जबाबदारी पार पाडली. एरवी नाजूक तब्बेतीची आई तुम्हाला जरा बरं नाहीसं झालं तर सगळं बळ एकवटून झाशीची राणी व्हायची. आणि आईसाठी तुम्ही जे गेली ३ वर्ष केलत, तिची सेवा, प्रेम ते क्वचितच कोणी नवरा आपल्या बायकोसाठी करत असेल. इतकं निस्वार्थ प्रेम.
तुम्हा दोघाची मुलं म्हणून श्वेता आणि मी जन्माला आलो, तुमच्या सारख्या आई वडिलांची सेवा करता येणं हेच आमच्या जन्माचं सार्थक आहे. आईची कमतरता कायमच जाणवेल. आज तुमच्या वाढदिवशी Mother’s Day आहे म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच❤️आईकडे आता जादूची कांडी आहे, तुमच्या कडे आशिर्वाद आहेत. ते दोन्ही आमच्या पाठीशी असू देत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो.
काही दिवासापूर्वी प्रिया बापटनं आई वडिलांसोबत परदेश वारी केली होती. त्याचे काही फोटो देखील तिनं शेअर केले होते.