मराठीतील सर्वात क्युट कपलमधील एक असणारं कपल म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत होय. या जोडीला ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा मोठी पसंती मिळत असते.
नुकताच प्रियाने आपला आणि उमेशचा एक सुंदर फोटो शेयर करत आपल्या आगामी 'आणि काय हवं' 3 च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.
यामध्ये पती पत्नीच्यामध्ये असणारं नाजूक नातं उलगडण्यात आलं होतं. पती पत्नीमध्ये असणारे रुसवे फुगवे त्याच्या पलीकडे जात एकमेकांवर असणारं प्रेम यासर्व गोष्टींवर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला होता.
ही वेबसिरीज प्रेक्षकंना खुपचं पसंत पडली होती. त्यामुळे याचा दुसरा भागसुद्धा काढण्यात आला होता. आत्ता या दोन्ही भागांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर ही जोडी 3 रा भाग घेऊन येत आहे.