मुंबई, 16 डिसेंबर : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनयासोबत स्वप्निल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा प्रकाश झोतात येत असतो. अशातच आज स्वप्नील जोशीच्या लग्नाचा वाढदिवस असून त्याने त्याच्या बायको लीनासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने ही पोस्ट शेअर करताच काही वेळातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. स्वप्नील जोशीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने बायको लीनासोबतच्या फोटोंचा कोलाज करुन व्हिडीओ बनवला आहे. व्हिडीओ सोबत त्याने लिहिलं, ‘हसवल्याबद्दल धन्यवाद. मला कुटुंब दिल्याबद्दल धन्यवाद. आठवणींबद्दल धन्यवाद. वेडेपणाबद्दल धन्यवाद. विचित्रपणाबद्दल धन्यवाद. सर्व लहान गोष्टींसाठी धन्यवाद. देव तुला कायम आशिर्वाद देईल.’ स्वप्नीलने ही खास पोस्ट त्याच्या आणि बायको लीना जोशीच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला स्वप्नील बायकोसाठी खास उखाणा घेतो. तो म्हणतो, ‘घाबरुन असतो मी बायकोला असलो जरी हौशी कारण दात तोडायचं ऑफिशिअल लायसन्स म्हणजे आमची लीना जोशी’. हेही वाचा - Manasi Naik : ‘जानेवारी आपल्याला स्वप्न दाखवते आणि…’; मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट वाचून तुम्हीही व्हाल Emotional स्वप्नीलच्या या पोस्टवर भरभरुन शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि त्याची पत्नी लीना आराध्ये यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांनी 2011 मध्ये महाराष्ट्रीयन रितीरिवाजाने लग्न केलं. आता स्वप्नील आणि लीना एकमेकांसोबत खूप आनंदी आयुष्य घालवत आहेत. स्वप्नील अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी आणि मुलीसोबतचे फोटो शेअर करत असतो.
दरम्यान, अभिनेता स्वप्नीलने लग्नाआधी लीना आराध्यासमोर एक अट ठेवली होती. स्वप्नीलने लीनाला सांगितले होते की, लग्नानंतर तिला त्याच्या कुटुंबासोबत राहावे लागेल. लीनालाही सासू-सासऱ्यांसोबत राहायचे होते, त्यामुळे तिने स्वप्नीलची अट मान्य करून लग्नाला होकार दिला.
स्वप्नील जोशीचं प्रेम जीवन चढउतारांनी भरलेलं होतं. त्यानं दोनदा लग्न केलं. स्वप्नीलचं पहिलं लग्न अपर्णा जोशीसोबत झालं होतं. खरं तर, स्वप्नील 11वीत असताना पहिल्यांदा प्रेमात पडला होता. त्यादरम्यान त्याची अपर्णासोबत भेट झाली. दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. यानंतर 2005 मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.