मुंबई, 24 डिसेंबर- बॉलिवूडप्रमाणे सध्या मराठी सृष्टीत सध्या अनेक सेलिब्रिटींची लग्नसराई सुरू आहे. मराठी चित्रपट अभिनेता सुयोग गोऱ्हे**( suyog gorhe )** हा देखील नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. सुयोग गोऱ्हे हा त्याची गर्लफ्रेंड नेहा शिंदे हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. त्याच्या लग्नसोहळ्याचे व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राजश्री मराठीने त्यांच्या इन्स्टा पेजवर अभिनेता सुयोग गोऱ्हेच्या लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- ऋताच्या मेंदी आणि BRIDAL फेसपॅकवरून रंगली साखरपुड्याची चर्चा! सुयोग गोऱ्हे हा मराठी चित्रपटात नायक तर कधी सहाय्यक भूमिका साकारताना दिसला आहे. सुयोग उत्कृष्ट अभिनेता तर आहेच शिवाय पेशाने तो डॉक्टर देखील आहे. सुयोग हा मूळचा नाशिकचा आहे. आर. वाय. के. कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. मोतीवाला होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमधून त्याने होमिओपॅथी फिजिशियनची पदवी प्राप्त केली आहे. कॉलेजमध्ये असताना सुयश आणि त्याचे मित्र बाईक आणि कार स्टंट करायचे. एकदा असाच स्टंट करत असताना तो स्टंट त्याच्या जीवावर बेतला असता, त्या घटनेतून तो थोडक्यात बचावला होता. तेव्हापासून असे स्टंट कधीच करायचे नाहीत असा निश्चय केला.
सुयोग शेंटिमेंटल, सातारचा सलमान, सिनिअर सिटीझन, अनान, गर्लफ्रेंड, कृतांत, आम्ही बेफिकर अशा चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला