मुंबई, 13 एप्रिल- ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी मालिका तसेच चित्रपट व नाटक यामधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. शरद पोंक्षे सोशल मीडियावर रोखठोकपणे आपलं मतं मांडताना दिसतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray)यांचे काल ठाण्यात भाषणा झाले. या भाषणाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आता यासंबंधीच पोस्ट नुकतीच अभिनेते शरद पोंक्षे ( sharad ponkshe ) यांनी केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं.बऱ्याच काळान धारदार भाषण .हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण.धन्यवाद राजसाहेब.🙏#मनसे #RajThackeray #मनसे_वर्धापनदिन #ameykhopkar…सध्या शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिय दिली आहे.
आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं.बऱ्याच काळान धारदार भाषण .हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण.धन्यवाद राजसाहेब.🙏#मनसे #RajThackeray #मनसे_वर्धापनदिन #ameykhopkar
— SHARAD PONKSHE (@ponkshes) April 12, 2022
राज ठाकरे काय म्हणाले होते भाषणात ? मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी ठाण्याच्या ‘उत्तर’सभेत काल त्यांच्यावर टीका करणाऱ्या सर्वच विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांनी या सभेत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन घरात केले पाहिजे. महाराष्ट्रात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत; परंतु राज्याच्या गृह खात्याने सर्व मौलवींना बोलावून मशिदींवरील भोंगे ईदपूर्वी ३ मेपर्यंत उतरवायला भाग पाडावे. तसे झाले नाही तर जेथे भोंगे सुरू असतील तेथे हनुमान चालीसा वाजवली जाईल. माझ्या भात्यात आणखीही बाण आहेत. मला ते बाहेर काढायला लावू नका. वाचा- मशिदींवरील भोंगे, NCP वर निशाणा, राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे याशिवाय राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावरही निशाणा साधला. राज ठाकरे यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.