मुंबई, 30 मार्च- प्रसाद ओकने ( prasad oak) दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, गायन ह्या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. या सगळ्यातही प्रसाद सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतो. कधी फोटो तर कधी भन्नाट व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना नेहमी सरप्राईज देत असतो. सध्या इन्स्टा रीलचं वारं जोरात आहे. मग काय प्रसादनं देखील वेळीचा सदुउपयोग करत बायको मंजिरीसोबत एक ( manjiri oak ) भन्नाट रील केलं आहे. त्याचं हे रील चांगलच चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. प्रसाद ओकनं पत्नी मंजिरीसोबत एक इन्स्टा रील केलं आहे. या इन्स्टा रीलला त्यानं एक कॅप्शन देखील दिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, traffic मधला टाइमपास .. 😜 याला अशी कॅप्शन का दिली आहे ते पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते. कारण प्रसाद आणि मंजिरी कारमध्ये आहेत आणि ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. अशावेळी काय करायचा असा सर्वांना प्रश्न पडतो. मग काय नेहमीप्रमाणे वेळेचा सदुउपयोग करत प्रसाद आणि मंजिरीनं एक भन्नाट रील बनवलं आहे. वाचा- ‘प्रयत्न करुनही वाचवू शकलो नाही’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाचा धक्कादायक मृत्यू किशोर कुमार यांच्या पगली… पगली.. कभी तुमने सोचा….या हिंदी गाण्यावर भन्नाट रील बनवत ट्रॅफिकमधला टाइमपास शोधला आहे. त्यांच्य या रीलवर सेलेब्स चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. एकानं म्हटलं आहे की, क्यूट रोमॅंटिक टाइमपास तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की, वेळेचा सदुपयोग छान करून घेतलात….अशा अनेक कमेंट त्यांच्या या रीलवर आल्या आहेत. वाचा- ‘तू माझ्यासाठी स्टार नाहीस…’, चंद्रमुखी अमृतासाठी अंकिताची लांबलचक पोस्ट प्रसादची बायको मंजिरी बिझनेस वूमन असून ती अनेक ब्रँडसोबत कोलॅबोरेशन देखील करत असते. मंजिरीनं प्रसादसोबत असिस्टंट डायरेक्टरचंही काम केलं आहे. मंजिरी देखील सोशल मीडियावर सक्रीय असते. तिचे अनेक फोटो तसेच तिच्या कामाबद्दल माहिती ती शेअर करत असते.
प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमाची सध्या सगळीकडं चर्चा आहे. या सिनेमात अमृता खानविलकर चंद्रमुखीची भूमिका साकारताना दिसत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. - विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi ) या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे.