जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुमच्याबद्दल गॉसिप करणाऱ्या ...' प्रसाद ओकचा नेमका टोला कोणाला, पोस्टनं वेधलं लक्ष

'तुमच्याबद्दल गॉसिप करणाऱ्या ...' प्रसाद ओकचा नेमका टोला कोणाला, पोस्टनं वेधलं लक्ष

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक

अभिनेता प्रसाद ओक हा मराठी इंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वत:चं स्थान निर्माण केलयं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

**मुंबई, 24 जुलै-**अभिनेता प्रसाद ओक हा मराठी इंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वत:चं स्थान निर्माण केलयं.  प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचे काही भन्नाट व्हिडिओ तसेच फोटो देखील चाहत्यांसोबच शेअर करत असतो. आता त्याच्या वडापाव या सिनेमाची सगळीकडं जोरदार चर्चा रंगलेली आहे. अशातच प्रसादनं एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. प्रसादने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक गॉसिप्स करणाऱ्यांबद्दल भाष्य केले आहे. त्याने त्या व्यक्तींना टोलाही लगावला आहे.त्याने म्हटलं आहे की, तुमच्याबद्दल गॉसिप करणाऱ्या लोकांचं तुम्ही कौतुक करायला हवं. कारण त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या सोडून ते तुमच्या समस्यांबद्दल चर्चा करतात आणि ही अजिबात सोपी गोष्ट नाही, असे प्रसाद ओकने म्हटलं आहे.

News18

प्रसाद अभिनयाशिवाय दिग्दर्शनाची यशस्वी धुरा सांभाळताना दिसला. त्याच्या चंद्रमुखी सिनेमानं अफाट यश मिळवलं. शिवाय त्याचा धर्मवीर सिनेमा देखील हिट ठरला. त्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. याशिवाय तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो. या सगळ्या प्रगतीत त्याच्या पत्नी मंजिरीची त्याला महत्त्वाची साथ मिळाली. नुकतचं एका मुलाखतीत त्यानं याबद्दल मंजिरीचं कौतुक देखील केलं होत.

News18लोकमत
News18लोकमत

प्रसाद ओक सध्या लंडनमध्ये आहे. तो त्याच्या आगामी वडापाव या चित्रपटाचे शूटींग करत आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, सिद्धार्थ साळवी, शाल्व किंजवडेकर, सविता प्रभुणे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात