मुंबई, 29 जुलै- छोट्या पडद्यावर तूफान लोकप्रिय झालेल्या ‘कॉमेडी ची जीएसटी एक्सप्रेस’, ‘तुमच्यासाठी काही पण’, ’ एकदम कडक’ आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला विनोदी अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू..’ या ओंकारच्या संवादाने तर समस्त प्रेक्षकांना वेड लावले. मंध्यतरी ओंकार भोजने “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची” या कवितेमुळे चर्चेत आला होता. विशेष म्हणजे त्याचा हा व्हिडिओ सत्यजीत तांबे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी शेअर केला होता. आता पुन्हा एकदा ओंकार भोजनेचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ओंकार हा उत्तम अभिनेत्याबरोबरच उत्तम कवी देखील आहे. ओंकारनं पुन्हा एक कविता सादर केली. या त्याच्या या कवितेचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.ओंकार भोजनेने एका कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांसमोर बोलताना एक कविता सादर केलीय. ही कविता सध्या चांगलीच व्हायरल झालीय. या कवितेत ओंकार म्हणतो, “Talent ची आमच्या गावभर चर्चा नाही मोठेपणाचा आव रे कुणी निंदा कुणी भी वांदा चिपळूण आमचं गाव रे” ओंकारच्या या कवितेला उपस्थित प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली आहे. हा जुना व्हिडिओ असून ओंकारने सरला एक कोटीच्या प्रमोशन दरम्यान ही कविता एका कार्यक्रमात सादर केली होती. त्याच्या चाहत्यांना देखील ही कविता खूप आवडली आहे. अनेकांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.
ओंकारच्या कामाबद्दल सांगाचे तर तो ‘बॉईज 2’, ‘बॉईज ३’ आणि ‘घे डबल’ या चित्रपटांतही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. सोशल मीडियावर देखील तो प्रचंड सक्रीय असतो. त्याचे काही व्हिडिओ व फोटोतो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.