मुंबई, 26 ऑक्टोबर : मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री मानसी नाईकची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायशी केली जाते. तिला मराठीतील ऐश्वर्या राय म्हटलं जातं. मानसी कायमच आपल्या अभिनयानं सगळ्यांची मनं जिंकत असते. अभिनयासोबतच मानसी नृत्य आणि स्टेज परफॉर्मन्सही करते. सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेली मानसी कायमच चाहत्यांसोबत काहीना काही शेअर करत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच मानसीचा आणखी एक लेटेस्ट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
मानसी नाईकने काही लेटेस्ट व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या या व्हिडीओंनी सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओतील तिच्या लुकवरुन तिला ट्रोल करण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये मानसी साडी घालून अभिनय करताना दिसतेय. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असून तिला तिच्या लुकवरुन आणि अभिनयावरुन ट्रोल केलं जातंय.
View this post on Instagram
'मानसीचा मोहक अंदाज तोही असंख्य फिल्टर वापरून, फिल्टर कमी वापरा बाई, ओव्हर अॅक्टिंगची दुकान, व्हिडीओ आवडला नाही', अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत आहेत. सध्या मानसीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला दिसतोय.
दरम्यान, मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ अशा अनेक चित्रपचांत भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते असून तिच्या लेटेस्ट पोस्टसाठी चाहते कायमच प्रतिक्षेत असतात. कधी कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
बघतोय रिक्षावाला' हे गाणं प्रचंड प्रमाणात गाजलं. या गाण्यासोबतच अभिनेत्री मानसी नाईकही घराघरांत पोहचेली. नवरा प्रदीप खरेरा याच्यासोबतचे काही फोटो व व्हिडिओ देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल होत असलेले पहायला मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instagram post, Marathi actress, Marathi entertainment, Marathi news