मुंबई, 13 मार्च- ‘मन उडू उडू झालं**’ (Man Udu Udu Zal)** मालिकेने अल्पववधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सानिका आणि कार्तिकच्या चुकीचा परिणाम इंद्रा (Indra) आणि दिपूच्या (Deepu) नात्यावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सानिकाने कार्तिक सोबत लग्न केले आहे. हे लग्न घरच्यांना कळावे म्हणून सानिका नेहमी प्रयत्न करताना दिसत असते. आता तर तिने चक्क प्रेग्नेंट असल्याचं सत्य नाटक केलं आहे.या कारणामुळे कार्तिकसोबतचे तिचे लग्न मान्य करतील अशी खात्री सानिकाला वाटत आहे. दिपू ह्या सर्व गोष्टींचा उलगडा होऊ न देण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशातच सानिकाला बघायला आलेल्या मुलाला म्हणजेच अमितला दिपू नकार द्यायला लावते. मात्र दिपूने सांगितलं म्हणून मी सानिकासोबत लग्न करायला नकार देतोय हे अमित सगळ्यांसमोर सांगतो. याशिवाय तो दीपूला सुनावताना देखील दिसत आहे. मात्र मालिकेत नवीन एंट्री घेतलेल्या अमितविषयी ( anil rajput ) जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वाचा- ही माझीच गोष्ट एकही शब्द खोटा नाही.. जुई गडकरीने केला आजारपणाचा खुलासा ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zal) मालिकेत अमितची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव अनिल राजपूत असं आहे. अनिलने अनेक हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. अनिलचं सगळं बालपण मुंबईत गेले आहे. तो मुंबईतच लहानाचा मोठा झाला. के जी जोशी कॉलेज आणि एन जी बेडेकर कॉलेजमधून त्याने शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच अनिलने विविध नाट्य स्पर्धा आणि एकांकिका मधून सहभाग दर्शवला होता. नवख्या कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारे अभिनय कट्टा या खुल्या व्यासपीठाअंतर्गत त्याने नाटकातून सहभाग दर्शवला. प्रेमा तुझा रंग कसा, महाराष्ट्र जागते रहो अशा मराठी मालिकांमध्ये त्याने काम केला आहे. पिंजरा खूबसुरती का , मेरे साईं या हिंदी मालिकेत देखील त्याने काम केले आहे.
अनिल लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रितेश देशमुख प्रथमच दिग्दर्शन करत असलेल्या ‘वेड’ या आगामी मराठी चित्रपटात अनिल महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 22 ऑगस्ट 2022 रोजी वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक खास वैशिष्ट्य असे की रितेशची पत्नी म्हणजेच जेनेलिया देशमुख या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. रितेश देशमुखने या चित्रपटाचे नाव जाहीर करताच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाबाबत अनिल देखील तितकाच उत्सुक आहे.