Home /News /entertainment /

मराठमोळ्या दिग्दर्शकाचं बॉलिवूडमध्ये पाऊल; वैभव तत्ववादी करणार प्रमुख भूमिका

मराठमोळ्या दिग्दर्शकाचं बॉलिवूडमध्ये पाऊल; वैभव तत्ववादी करणार प्रमुख भूमिका

'रिंगण' 'कागर' फेम दिग्दर्शक आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचा मुहूर्तही करण्यात आला आहे.

मुंबई, 9 डिसेंबर: चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मकरंद माने ( Film Producer Makarand Mane) हे त्यांच्या आगामी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tatwawaadi) आणि अभिनेत्री अंजली पाटील (Anjali Patil) दिसणार आहेत. नुकतेच वैभवने आपल्या इंस्टाग्राम पेजवर त्याच्या नवीन हिंदी चित्रपटाची घोषणा केली. त्यात त्याने अंजलीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं की "आमच्या नवीन हिंदी चित्रपटाची घोषणा करताना मला खूपच आनंद होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने आणि अंजली पाटील यांचे आभार". चित्रपटाबद्दल बोलताना मकरंद माने म्हणाले की, "मी आता एवढेच सांगू शकतो की या चित्रपटाचा विषय हा प्रत्येकाच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. नवीन उलगडणारी ही प्रेम कहाणी असणार आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल". दिग्दर्शक मकरंद माने त्यांच्या रिंगण आणि कागर या चित्रपटांमुळे अधिकच चर्चेत आले होते. तसेच त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं  होतं. मराठी चित्रपटसृष्टीत कारकीर्द गाजवल्यानंतर आता ते हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाद्वारे ते कसे हिंदी चित्रपटसृष्टीत टिकून राहतात हे आता पाहायचे आहे.
कागरमधल्या रिंकू राजगुरु आणि शुभंकर तावडेच्या प्रेम कहाणीनंतर वैभव आणि अंजलीची ही प्रेम कहाणी प्रेक्षकांना किती आवडते हे आता पाहायचे आहे. दिग्दर्शक मकरंद माने हे नेहमीच एक वेगळी कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येतात. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील पात्रनिवडही अतिशय साजेशी असते. ते कायमच नवीन अभिनेत्यांना संधी देत आले आहेत. आतासुद्धा हा चित्रपट लोकांना किती आवडतो आणि यातील वैभव आणि अंजलीचा अभिनय कितपत या प्रेम कहाणीला साजेसा ठरतो हे आता पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Marathi entertainment, Vaibhav tattvavadi

पुढील बातम्या