माझ्या नवऱ्याची बायकोमधल्या 'माया'च्या अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा
माझ्या नवऱ्याची बायको (Majya Navryachi Bayko) या भूमिकेत काम करणारी माया अर्थातच रुचिरा जाधव (Ruchira Jadhav)ने हटके अंदाजात फोटो शूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान हिट होत आहेत.
माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका आहे. त्यातली काही पात्र फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. त्याच सीरिअलमधलं एक पात्र म्हणजे माया. अभिनेत्री रुचिरा जाधव या सीरिअलमध्ये 'माया'चा रोल करत आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) 'माया' ही भूमिका करत आहे. रुचिरा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. आपले हटके फोटो आपल्या चाहत्यांसोबत ती शेअर करत असते.
रुचिरा जाधवला पहिला ब्रेक मिळाला 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेमधून. रुचिराने आजपर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे.
रुचिराचं शालेय शिक्षण पराग विद्यालयामध्ये झालं, त्यानंतर तिने के.जे सोमय्या कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच रुचिरा अभिनयामध्ये नाव गाजवत होती.
कॉलेजमध्ये असताना 2012 साली तिने 'सकाळ करंडक' मिळवला होता. रुचिराला नाटकासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्रीचं दुसरं पारितोषिक मिळालं होतं.
रुचिराने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंवर लाइक्सचा पाऊस पडला आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या सीरिअलच्या शूटिंगमध्ये रुचिरा फारच बिझी असते. त्यामुळे तिला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली.