लॉस एंजिलिस,02 जानेवारी: माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko) या मालिकेतील शनाया आपल्यापैकी अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. तिचा बोल्ड लूक, मालिकेत दाखवला जाणारा मस्तीखोर पण प्रेमळ स्वभाव, अभिनय यामुळे अनेक चाहते तिच्या प्रेमात आहेत. रसिका सुनीलच्या (Rasika Sunil) खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायलादेखील तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. रसिकाने नव-वर्षाचं स्वागत अतिशय जोरदार केलं आहे. पण तिने नुकतेच 2 फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रसिका सुनीलने आपल्या इन्स्टाग्रामवर आदित्य बिलागीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन दिलं आहे, ‘2000 किस. तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या खूप शुभेच्छा. 2020 मध्ये बऱ्याच वाईट घटना घडल्या पण त्या वर्षाने मला कृतज्ञ राहण्यासाठी अनेक कारणंही दिली आहेत.’ या पोस्टमधील रसिका आणि आदित्यची केमिस्ट्री बघून चाहत्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. रसिकाने त्याच्यासोबत लॉस एंजिलिसमध्ये हा फोटो काढला आहे. रसिकाच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिच्यावर नव-वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. अभिनेत्री रसिका सुनीलने भरनाट्यमचं शिक्षण घेतलं आहे. तसंच तिला बुलेट चालवायलाही आवडते. रसिकाने काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.