मुंबई, 03 जानेवारी : अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या रिलेशनशीपच्या चर्चांमुळे. नववर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने आदित्य बिलागीचा (Aditya Bilagi) फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने कॅप्शन दिलं होतं, ‘2000 किस. तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या खूप शुभेच्छा. 2020 मध्ये बऱ्याच वाईट घटना घडल्या पण त्या वर्षाने मला कृतज्ञ राहण्यासाठी अनेक कारणंही दिली आहेत.’ असं कॅप्शनही दिलं होतं. पण तिने कॅप्शनसोबत शेअर केलेल्या आदित्यच्या फोटोमुळे चाहत्यांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं होतं. रसिकाच्या पोस्टबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना तिनेच खुलासा केला आहे. तिने आदित्यचं आणि तिचं नातं लपवून न ठेवता सांगितलं आहे की, ‘हो मी आदित्य बिलागीला डेट करतेय’ शिक्षणासाठी यूएसला गेलेली असताना तिची आणि आदित्यची ओळख झाली. तिथेच त्यांची केमिस्ट्री छान जमली आणि आता ते एकमेकांना डेट करत आहेत.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून शनाया अर्थात रसिका सुनीलची कायमची एक्झिट होणार का या प्रश्नावरही तिने उत्तर दिलं आहे की, ‘शनाया लग्न यूएसला जाते हे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. पण शनायाची कायमची एक्झिट होईल का हे सांगता येणार नाही. कारण ही शेवटी मालिका आहे यात काहीही होऊ शकतं.’
रसिका आणि आदित्य सध्या यूएसमध्ये एकत्र आहेत. नवीन वर्षही त्यांनी एकमेकांसोबतच साजरं केलं.