मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील या मुख्य अभिनेत्रीची होणार एक्झिट?

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील या मुख्य अभिनेत्रीची होणार एक्झिट?

माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko) या मालिकेतून एक महत्वाचं पात्र वगळलं जाणार असल्याची चर्चा आहे. लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 डिसेंबर: माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko) ही मालिका छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका आहे. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आजपर्यंत या मालिकेत अनेक वेगळी वळणं प्रेक्षकांनी पाहिली आहेत. पण आता मालिकेतील एक महत्वाची अभिनेत्री सीरिअलपासून दूर जाणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आम्ही मालिकेत काम करणाऱ्या शनाया अर्थात रसिका सुनीलबद्दल (Rasika Sunil) बोलत आहोत. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया हे पात्र येत्या काही दिवसातच वगळलं जाणार आहे. सध्या शनाया रेडिओ जॉकी झालेली आहे असं दाखवण्यात आलं आहे. शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर.जे बिंदूराणीला कॉल करतो आणि त्यांची पुन्हा एकदा भेट होते. त्यानंतर शनाया त्याच्यासोबत परदेशी निघून जाते असं चित्र रंगवण्यात येणार आहे. त्यामुळे शनाया अर्थात रसिका सुनीलची मालिकेतून कायमचीच एक्झिट होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

काही महिन्यांपूर्वी रसिका सुनील ऐवजी इशा केसकर या मालिकेत शनायाची भूमिका साकारताना दिसली होती. रसिकाला खऱ्या आयुष्यात शिक्षणासाठी परदेशी जायचं असल्यामुळे तिच्या जागी इशा केसकरची वर्णी लागली होती. पण आता तिचं पात्रच या मालिकेतून वगळलं जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मालिकेत हा बदल नक्की कशामुळे केला जातोय हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे तुम्ही जर शनायाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही दु:खाची बातमी आहे.  
First published:

Tags: Marathi entertainment, Rasika sunil, Zee Marathi

पुढील बातम्या