मुंबई, 28 जून- सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या ते त्यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. महेश मांजरेकर सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. त्यांचा एक व्हि़डिओ समोर आला आहे, यामध्ये महेश मांजेरकर लेकाच्या हॉटेलमध्ये चक्क जेवण बनवताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली आहे. सत्या मांजरेकरच्या या हॉटेलचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहे. आता अभिनेता आकाश ठोसरने सत्य मांजरेकरांच्या हॉटेलमधील एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्वत: महेश मांजरेकर जेवण बनवताना दिसत आहेत. सत्या मांजरेकरने काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरात स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘सुका सुखी’ असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे. या हॉटेलला नुकतंच आकाश ठोसरने भेट दिली. त्यावेळीचा एक व्हिडिओ आकाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण महेश मांजेरक यांचे कौतुक करत आहेत. वाचा- ‘गजनी’ फेम अभिनेत्रीचा घटस्फोट? 7 वर्षांच्या नात्याला फुलस्टॉप आकाश ठोसरने सत्या मांजरेकरांच्या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवणावर ताव मारल्याचेही पाहायला मिळत आहे. पिवळी बटाट्याची भाजी, वालाचं बिरडं, गवारची भाजी, चपाती, डाळ अशा विविध पदार्थांची चव आकाशने चाखल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला मांजरेकरांच्या ‘सुका सुखी’ हॉटेलमधील जेवणाची चव आवडल्याचे सांगत ‘मस्ट ट्राय’ असे लिहिलं आहे. महेश मांजेरकर देखील लेकाच्या हॉटेलमध्ये अगदी मन लावून जेवण बनवत असल्याचे दिसत आहेत.
काही दिवसापूर्वी सत्याने हॉटेल सुरू केल्याची माहिती सोशल मीडिया पोस्ट करत दिली होती. सत्या मांजरेकरने इन्स्टाग्रामवर दोन फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. यातील एका फोटोत सत्या हा हॉटेल बाहेर उभा असल्याचे दिसत आहे. तर व्हिडिओत सत्याने हॉटेलमधील जेवणाच्या काही खास पदार्थांची झलक दाखवली होती. या कॅप्शन देताना सत्याने या मागची संकल्पना कोणाची होती, याचा खुलासा केला होता.
‘सुका सुखी’ हे सुरु करण्याची कल्पना आणि स्वप्न हे माझ्या वडिलांनी पाहिले होते. घरगुती पदार्थ लोकांना खायला मिळावेत हे यामागचे कारण होते. त्यामुळेच आम्ही ‘सुका सुखी’ची सुरुवात केली. पौष्टिक, स्वादिष्ट आणि घरगुती अन्न पोहोचण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला”, असे सत्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले होते.
सत्या मांजरेकरने सुरु केलेल्या या हॉटेलमध्ये अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता येतो. अनेक शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चवही तुम्हाला इथे चाखता येते.