"तुझी लाज वाटते कंगना", लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकरांचं व्हायरल झालेलं TWEET फेक

कंगना रणौतने (kangana ranaut) उर्मिला मातोंडकरवर (urmila matondkar) जहरी टीका केल्यानंतर लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (madhuri kanitkar) यांचं ट्वीट व्हायरल झालं होतं.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला (Urmila Matondkar) सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला. कंगनाविरोधात मराठी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (Lieutenant General Dr Madhuri Kanitkar) यांचं ट्वीटही व्हायरल होऊ लागलं होतं. 'कंगना तुझी लाज वाटते', अशी पोस्ट या ट्वीटमध्ये केली होती. मात्र हे ट्वीट फेक असल्याचं समोर आलं आहे.

डॉ. माधुरी कानिटकर यांच्या नावाने व्हायरल झालेल्या या ट्वीटमध्ये कंगनाचा धिक्कार करण्यात आला आहे, तर उर्मिलाची बाजू घेण्यात आली आहे. कंगनाची लाज वाटत असून उर्मिलाचा अभिमान वाटतो आहे, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटसह कंगनाचा उर्मिलाविरोधात वक्तव्य करणारा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.

डॉ. कानिटकर यांच्या नावाने करण्यात आलेल्या या ट्वीटमध्ये म्हटलं आहे , "लज्जास्पद आहे हे कंगना रणौत. मी सहसा कुणाबाबत अशी प्रतिक्रिया देत नाही. मात्र एक महिला म्हणून मला यामुळे खूप वेदना झाल्या आहेत. उर्मिला मातोंडकरजी आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे"

हे वाचा - 'उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार', कंगना रणौतने उधळली मुक्ताफळं

उर्मिलाने कंगनाविरोधात वक्तव्य केल्यानंतर कंगनाने टाइम्स नाऊशी बोलताना उर्मिला मातोंडकरवर जहरी टीका केली, "उर्मिला देखील सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. मला माहित आहे की ते अत्यंत निंदनीय आहे. पण ती तिच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी ना? जर तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही?" कंगनाने असं वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीका होऊ लागली.

हे वाचा - सौरव गांगुलीचा हृतिकला सल्ला, बायोपिकमध्ये त्याची भूमिका करायची असेल तर...

कंगनाच्या या विधानानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यातून तिने कंगनाला तिचे  नाव न घेता उत्तर देण्याचा प्रयत्न केला असावा असं दिसतं आहे.

'जय महाराष्ट्र, जय हिंद, शुभ रात्री' अशी कॅप्शन देत उर्मिलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला.'सूड माणसाला जाळत असतो, संयमच सुडावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय असतो.', असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Published by: Priya Lad
First published: September 17, 2020, 2:34 PM IST

ताज्या बातम्या