मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Maharashtrachi Hasyajatra फेम वनिताच्या हातावर चढला सुमितच्या प्रेमाचा रंग; व्हायरल झाले मेहंदीचे फोटो

Maharashtrachi Hasyajatra फेम वनिताच्या हातावर चढला सुमितच्या प्रेमाचा रंग; व्हायरल झाले मेहंदीचे फोटो

वनिता खरात

वनिता खरात

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरात पोहोचली आहे. वनिता खरात मराठी सिने सृष्टीतील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 31 जानेवारी- 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरात पोहोचली आहे. वनिता खरात मराठी सिने सृष्टीतील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीने गेल्यावर्षी बोल्ड फोटोशूट करत धुमाकूळ माजवला होता. या फोटोशूटमुळे वनिता खरात प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर आता पुन्हा एकदा वनिता चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण फारच खास आहे. वनिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी अभिनेत्रीच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे वनिता खरातला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. तीचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान गेल्यावर्षी वनिताने न्यूड फोटोशूट करत खळबळ माजवून दिली होती. यामध्ये काहींनी अभिनेत्रीचं कौतुक केलं होतं, तर काहींनी तिच्यावर टीका केली होती. वनिता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.

Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातचं रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट; शेअर केला लिपलॉकचा PHOTO

वनिता खरात येत्या 2 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी अभिनेत्रीच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वनिताच्या हातावर मेहंदी सजली आहे. अभिनेत्री आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. वनिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये वनिताच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढण्यात आली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर 'सुमितवाणी' असा हॅश टॅग दिला आहे. कारण तिच्या होणाऱ्या पतीचं नाव सुमित लोंढे असं आहे.

वनिता खरातप्रमाणे सुमित लोंढेसुद्धा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचा भाग आहे. या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिल्यापासूनच त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून होती. अखेर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यापासून चाहते खुश आहेत. वनिता आणि सुमित सतत सोशल एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. या दोघांचं बॉन्डिंग यातून अगदी स्पष्ट दिसून येतं.

वनिता खरातने याआधी आपल्या प्री वेडिंग शूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये वनिता आणि सुमित लिपलॉक करतानादिसून आले होते. त्यांच्या बोल्ड- रोमँटिक चर्चा होत आहे. दरम्यान आता मेहंदीचे फोटो व्हायरल होत आहेत. चाहते आणि सेलिब्रेटी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

First published:

Tags: Maharashtrachi Hasyajatra, Marathi actress, Marathi entertainment, Vanita Kharat