मुंबई, 31 मे- मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) एक लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे (Kedaar Shinde) प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांच्या दिग्दर्शनामधून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमठविला आहे. सध्या ते आपल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट लोकप्रिय कलाकार शाहीर साबळे यांच्यावर आधारित आहे. दरम्यान ते आपल्या एका नव्या पोस्टमुळे सध्या चर्चेत आहेत. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पाहूया काय आहे नेमकी पोस्ट. केदार शिंदे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात. बऱ्याचवेळा ते आपल्या व्यावसायिक आयुष्याबाबत, तर कधी खाजगी आयुष्याबाबत अपडेट्स देत असतात. केदार शिंदे हे प्रत्येक विषयावर परखड मते व्यक्त करताना दिसून येतात. ते सतत सोशल मीडियावरुन कोणत्या ना कोणत्या विषयावर लिखाण करत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पोस्ट चर्चेत असतात. आजही असंच काहीसं झालं आहे.
केदार शिंदे पोस्ट- केदार शिंदे यांनी नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी श्री स्वामी समर्थ यांची प्रतिमा शेअर करत, एक पोस्टसुद्धा लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय, ‘‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय… काही निर्णय स्वामींवर सोपवून घ्यायचे. कारण एक दरवाजा बंद होतो, तेव्हाच दुसरा दरवाजा उघडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. विश्वास हवा. त्यांच्यावर आहेच, स्वत:वर विश्वास हवा’’. **(हे वाचा:** ‘कष्ट केले की दिवस पालटतातच…’ दिग्दर्शक केदार शिंदेंची नवी पोस्ट चर्चेत ) केदार शिंदे यांच्या या पोस्टवर छटेचा नव्हे तर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये गायिका सावनी रवींद्र, अमृता खानविलकर, सोनालीका जोशी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.