मुंबई, 26 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकलानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान (KRK) यानं प्रतिक्रिया दिला आहे. KRK नं ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानं आमच्याकडे बहुमत नाही असं सांगितल्यानंतर केआरकेचं ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अजित पवारांवर निशाणा साधताना लिहिलं, आज अजित पवार धोब्याचा पप्पू ठरले. ना घरातले राहिला ना घाटवरचे. याशिवाय त्यानं आणखी एक ट्विट केलं ज्यात त्यानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. केआरकेची ही दोन्ही ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
So #AjitPawar and #DevendraFadnavis ji have already resigned and now it’s confirm that next govt will be formed by #ShivaSena #NCP and #Congress and #UdhavThackeray ji will be next CM of #Maharashtra! And this is what i predicted long ago.
— KRK (@kamaalrkhan) November 26, 2019
सुप्रीम कोर्टानं आदेश दिला होता की बुधवारी संध्याकाळी 5 वाजण्याआधी फ्लोअर टेस्ट घेण्यात यावी. यानंतर भाजपनं त्यांच्या सर्व आमदारांना रात्र 9 वाजता बैठकीसाठी बोलावलं होतं. पण त्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. ===============================================================

)







